IMD Alert : तामिळनाडू, आंध्रात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचे; चक्रीवादळाची शक्यता
Cyclone Arnab : बंगालच्या उपसागरात वातावरणात बदल झाला आहे. सध्याचे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात बदलू शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या अर्णब वादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आणखी एका चक्रीवादळाचा धोका...
IMD Rain Alert : महिनाभरापासून पाऊस नव्हता, पण थंडी होती. आता संक्रांतीच्या तोंडावर पाऊस सुरू झाल्याने सणात व्यत्यय येण्याची भीती आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादळ तयार होतंय का?
डिसेंबरमध्ये शांत असलेला बंगालचा उपसागर नवीन वर्षात अशांत झाला आहे. कमी दाबाचे क्षेत्र आता तीव्र झाले असून, ते श्रीलंकेपासून ५७० किमी अंतरावर आहे. पुढील ४८ तासांत ते चक्रीवादळात बदलू शकते. त्याला 'अर्णब' नाव दिले जाईल.
अर्णब चक्रीवादळाचा प्रभाव कोणत्या भागांवर असेल?
अर्णब चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका श्रीलंकेला बसू शकतो. भारतात तामिळनाडूवर मोठा परिणाम होईल. पुढील २-३ दिवस किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहतील. चेन्नई, पुद्दुचेरीसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा आहे.
आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता..
या वादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशातील नेल्लोर, चित्तूर, तिरुपती जिल्ह्यांत शनिवारी-रविवारी हलका ते मध्यम पाऊस पडेल. वादळ तीव्र झाल्यास पावसाचा जोर वाढेल. मात्र, तामिळनाडू इतका धोका आंध्र प्रदेशला नाही, ही दिलासादायक बाब आहे.
यापुढे येणाऱ्या चक्रीवादळांची नावे..
प्रत्येक चक्रीवादळाला वेगळा देश नाव देतो. थायलंडने 'मोंथा' नाव दिले होते. आता येणाऱ्या वादळाला बांगलादेशने 'अर्णब' हे नाव दिले आहे. यानंतर भारताने दिलेले 'मुरसु' हे नाव वापरले जाईल. त्यानंतर इराण, मालदीव यांची नावे आहेत.

