IAF Sukhoi 30 Crash Two Pilots Killed in Assam: काल संध्याकाळी 7.42 वाजता विमानाशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहिमेत दोन्ही पायलट्सचे मृतदेह सापडले. याआधी विमानाचा एक भाग सापडला होता, जो पूर्णपणे जळून खाक झाला होता.
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचं सुखोई लढाऊ विमान कोसळून झालेल्या अपघातात दोन पायलट्स शहीद झाले आहेत. स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुर्गाडकर अशी शहीद झालेल्या पायलट्सची नावं आहेत. काल संध्याकाळी 7.42 वाजता या विमानाशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली, ज्यात दोन्ही पायलट्सचे मृतदेह सापडले. याआधी, विमानाचा एक भाग सापडला होता, जो पूर्णपणे जळून खाक झाला होता. हे विमान काल आसाममधील जोरहाट एअरबेसवरून उड्डाणासाठी निघालं होतं. सुखोई-30 एमकेआय (Sukhoi-30 MKI) या लढाऊ विमानाचा रडारशी संपर्क तुटला असून शोधकार्य सुरू असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली होती.


