
Maratha Reservation
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभरातील समन्वयकांची बैठक पार पडली. बैठकीत SEBC कायदा न्यायालयात टिकवण्याला प्राधान्य देण्यावर एकमत झालं. सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. सर्व मागण्या एकत्रित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं विखे पाटलांनी सांगितलं. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक नेमण्याची माहिती दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक खर्च टाळण्याचं आवाहन करत अभिजीत दीपकेंच्या आणीबाणीच्या आव्हानावरही विखे पाटलांनी टीका केली. परकीय निधीच्या आरोपांवर भाष्य करत जनता मोदींच्या पाठीशी असल्याचा दावा केला.