Hyderabad Woman Ends Life Due to Extreme Fear of Ants : मुंग्यांच्या तीव्र भीतीमुळे २५ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. पोलिसांनी तरुणीने लिहिलेली सुसाईड नोट जप्त केली आहे.

Hyderabad Woman Ends Life Due to Extreme Fear of Ants : मुंग्यांच्या भीतीमुळे (Myrmecophobia) एका २५ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. ती खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात घडली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला लहानपणापासूनच मुंग्यांची भीती वाटत होती आणि तिने पूर्वी तिच्या गावातील रुग्णालयात समुपदेशनही घेतले होते.

२०२२ मध्ये लग्न झालेल्या या तरुणीला तीन वर्षांची मुलगी आहे. ४ नोव्हेंबरला सकाळी तिने आपल्या मुलीला नातेवाईकांच्या घरी सोडले. घर स्वच्छ करून तिला परत घेऊन येते, असे तिने सांगितले होते. सकाळी कामावर गेलेला पती संध्याकाळी परत आला, तेव्हा घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, असे वृत्तसंस्था पीटीआयने म्हटले आहे.

Scroll to load tweet…

घटनास्थळावरून मिळालेल्या चिठ्ठीत लिहिले होते - "श्री, मला माफ कर, मी या मुंग्यांसोबत जगू शकत नाही. मुलीची चांगली काळजी घे. सांभाळ कर". चिठ्ठीत काही मंदिरांमध्ये करायच्या नवसांबद्दलही उल्लेख होता.

घर साफ करताना मुंग्या दिसल्याने घाबरून तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे पोलिसांनी सांगितले. अमीनपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Scroll to load tweet…

मुंग्यांच्या तीव्र भीतीला 'मेर्मेकोफोबिया' (Myrmecophobia) म्हणतात. हा फोबिया असलेल्या व्यक्तींना मुंग्या दिसताच प्रचंड भीती वाटते. काहींना यामुळे पॅनिक अटॅक येऊ शकतो.

(आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही. जगण्याचा प्रयत्न करा. मानसिक आरोग्य तज्ञांची मदत घ्या. असे विचार मनात आल्यास 'दिशा' हेल्पलाइनवर संपर्क साधा. टोल-फ्री क्रमांक: 1056, 0471-2552056)