MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Bir Billing Paragliding : पॅराग्लायडिंग करताना हवेत कापला केक, सुरक्षिततेवर प्रश्न

Bir Billing Paragliding : पॅराग्लायडिंग करताना हवेत कापला केक, सुरक्षिततेवर प्रश्न

हिमाचलच्या बीड बिलिंगमध्ये पॅराग्लायडिंग करताना एका महिलेने हवेत केक कापला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उड्डाणावेळी केक कसा नेला आणि ऑपरेटर काय करत होते, असे सुरक्षिततेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

3 Min read
Author : Karishma R
Published : Nov 29 2026, 03:13 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
Himachal Paragliding : आकाशात केक कापणं सुरक्षित आहे का?
Image Credit : X/@rahulmahajanx

Himachal Paragliding : आकाशात केक कापणं सुरक्षित आहे का?

हिमाचल प्रदेशमधील बीर बिलिंगमध्ये एका महिला पर्यटकाने पॅराग्लायडिंग करताना केलेलं वाढदिवसाचं सेलिब्रेशन सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. या व्हिडीओमुळे साहसी खेळांमधील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही महिला हवेत उडत असताना हातात केकचा बॉक्स धरून केक कापत असल्याचं दिसत आहे.

Bir Billing #Himachal Paragliding or a flying birthday party? A tourist cutting cake mid-air with a box in hand raises serious safety questions. How was it carried during take-off? Adventure tourism is not a circus,sky is not a playground,Who is monitoring safety?@DcKangra https://t.co/AQj1AF4RzO

— Rahul Mahajan (@rahulmahajanx) November 27, 2026

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. टेक-ऑफ करताना हा केक कसा नेला आणि उड्डाणादरम्यान अशा प्रकारच्या गोष्टींना परवानगी असते का, असे प्रश्न विचारले जात आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
Mid-Air Birthday Celebration : हवेत उडताना बर्थडे सेलिब्रेशन
Image Credit : X/@rahulmahajanx

Mid-Air Birthday Celebration : हवेत उडताना बर्थडे सेलिब्रेशन

या व्हिडीओच्या सुरुवातीला पॅराग्लायडर पायलट एका हातात सेल्फी स्टिक धरून व्हिडीओ रेकॉर्ड करत महिलेच्या वाढदिवसाबद्दल सांगत आहे. "मॅडम जी का बर्थडे है आज, केक कटने वाला है भाई. गिराना नही है," असं तो हसत हसत तिला केक न पाडण्याची आठवण करून देत म्हणतो. त्यानंतर तो पुढे सांगतो की ती ४४ वर्षांची होत असून आकाशात आपला वाढदिवसाचा केक कापत आहे.

त्यानंतर ती केक कापते, एक तुकडा खाते आणि ते दोघेही हॅपी बर्थडे गाणं गातात. ती त्या व्यक्तीलाही केक विचारते, पण तो हसून नकार देत 'लँडिंगनंतर खाईन' असं सांगतो.

राहुल महाजन यांनी २७ नोव्हेंबर रोजी एक्सवर हा व्हिडीओ शेअर केला होता. हिमाचल प्रदेशमधील लोकप्रिय अ‍ॅडव्हेंचर टुरिझम डेस्टिनेशन असलेल्या बीर बिलिंगमध्ये टँडम पॅराग्लायडिंग करताना ही महिला हवेत आपला वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.

उडताना कोणीतरी केक कापत असल्याचं दृश्य पाहून टँडम फ्लाईट्सदरम्यान ऑपरेटर कोणती काळजी घेतात आणि यावर कोणाचं नियंत्रण असतं, याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आसमान में केक कट रहा है, अगली बार कहीं बारात न ले जाएं ऊपर!😂

https://t.co/rAP4OsOsDX

— Arvind Kumar (@truthwitharvind) November 27, 2026

महाजन यांनी आपल्या पोस्टमध्ये टेक-ऑफच्या वेळी केक कसा नेला यावर प्रश्न उपस्थित करत सुरक्षेची जबाबदारी कोणाची यावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच साहसी पर्यटनाला मनोरंजनाचे साधन मानू नका, कारण यात मोठे धोके असतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

34
Social Media Reactions : व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
Image Credit : X/@rahulmahajanx

Social Media Reactions : व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही युजर्सनी त्या महिलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि या अनोख्या सेलिब्रेशनचं कौतुक केलं, तर काहींनी पॅराग्लायडिंग फ्लाईटदरम्यान अशा प्रकारची गोष्ट करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

एका युजरने मस्करीत म्हटलं की, पुढच्या वेळी लोक आकाशात पूर्ण वरातच घेऊन जातील. तर इतरांनी ही कृती अनावश्यक आणि धोकादायक असल्याचं वर्णन केलं.

44
Safety Concerns Raised: सुरक्षेवर उपस्थित केले जात आहेत प्रश्न
Image Credit : X/@rahulmahajanx

Safety Concerns Raised: सुरक्षेवर उपस्थित केले जात आहेत प्रश्न

या व्हिडीओमुळे पर्यटक आणि साहसी क्रीडा ऑपरेटर यांच्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याच्या जबाबदारीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

या व्हिडीओमुळे प्रश्न निर्माण झाले असले तरी, सुरक्षेचे कोणतेही नियम मोडले गेले आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उड्डाणादरम्यानची परिस्थिती आणि ऑपरेटरने या कृतीला परवानगी दिली होती की नाही, याची पुष्टी अद्याप झालेली नाही.

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
भारताचे बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Yamuna River Pollution: यमुना नदीत कचरा टाकणाऱ्याला रोखले, दिल्लीत तरुणावर भडकला व्यक्ती
Recommended image2
Delimitation Bill: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे नेते चेन्नईत, स्टॅलिन यांची घेतली भेट
Recommended image3
Now Playing
Delimitation Bill | Raj Thackeray | राज ठाकरे: देश केंद्रशासित करण्याचा डाव
Recommended image4
Now Playing
Delimitation Bill | संजय निरुपम: शरद पवारांचा अनुभव एनडीएला फायदेशीर
Recommended image5
Now Playing
Sharad Pawar | Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार शरद पवारांची माफी मागणार?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved