
Delimitation Bill
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचे समर्थन करत संजय निरुपम यांनी महिला आरक्षण आणि वाढत्या लोकसंख्येनुसार लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्याची गरज अधोरेखित केली. शरद पवार आणि एम. के. स्टॅलिन यांच्या भूमिकेचे कौतुक करत काँग्रेसवर टीका केली. ठाकरे यांनीही विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. संजय राऊत २०२८ नंतर राजकारणातून निवृत्त होतील, असा दावा त्यांनी केला. शरद पवार एनडीएमध्ये आल्यास त्यांच्या अनुभवाचा सरकारला फायदा होईल, असे सांगत विजय वडेट्टीवारांनी पवारांवर केलेली टीका चुकीची असल्याचे म्हटले.