Monkey CPR Rescue Kerala: केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये विजेचा धक्का लागून बेशुद्ध झालेल्या दोन माकडांना वन संरक्षण समितीच्या कार्यकर्त्या उदया आणि सचित्र यांनी सीपीआर देऊन वाचवले. विजेच्या धक्क्याने एक माकड गंभीर जखमी झाले होते. 

तिरुवनंतपुरम: केरळमध्ये विजेच्या धक्क्याने बेशुद्ध झालेल्या दोन माकडांना वन संरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी नवजीवन दिले. तिरुवनंतपुरममधील विथुरा कल्लर येथे मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास विजेच्या तारेचा दोन माकडांना जोरदार धक्का बसला. विजेच्या तीव्र धक्क्याने एक माकड खाली पडले, ज्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जवळच काम करणाऱ्या वन संरक्षण समितीच्या कार्यकर्त्या उदया आणि सचित्र यांनी दोन्ही माकडांना बेशुद्ध अवस्थेत उचलले आणि सीपीआर दिला, त्यानंतर दोघांनाही नवीन जीवनदान मिळाले.

View post on Instagram