Love Story पालकांच्या विरोधाला न जुमानता रायचूरचे अमरेश नाईक आणि गदगच्या विजयलक्ष्मी राठोड यांनी धारवाडमध्ये लग्न केले आहे. दोसऱ्यांच्या प्रेमावर कुटुंबियांनी आक्षेप घेतला होता. तरीही मित्रांच्या मदतीने त्यांनी संसार थाटला आहे.

धारवाड (कर्नाटक) : पालकांच्या विरोधाला न जुमानता प्रेमी युगुलाने धारवाडमध्ये लग्न केले आहे. रायचूर जिल्ह्यातील अमरेश नाईक आणि गदग जिल्ह्यातील शिरहट्टी तालुक्यातील विजयलक्ष्मी राठोड यांनी लग्न करून नवीन संसाराची सुरुवात केली आहे.

ओळख आणि प्रेम

रायचूरच्या वन विभागात नोकरी करणारे अमरेश नाईक आणि गदग जिल्ह्यातील बीडनानाळ तांड्याच्या विजयलक्ष्मी राठोड गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. विजयलक्ष्मीच्या घरच्यांनी या प्रेमाला विरोध केला होता. घरच्यांची संमती मिळत नसल्याने दोघांनी त्यांना पटवण्याचा खूप प्रयत्न केला.

धारवाडमध्ये लग्न

कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता दोघांनी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आपले प्रेम जपण्यासाठी ते धारवाडला आले. इथे मित्रांच्या मदतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, धारवाडच्या केपीएससी कायदा महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या लक्ष्मी देवळात साध्या पद्धतीने, हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करून त्यांनी संसार थाटला. या लग्नाला नवदाम्पत्याचे जवळचे मित्र उपस्थित होते.

नवदाम्पत्याला शुभेच्छा

पालकांच्या विरोधाला न जुमानता प्रेमी युगुल एकत्र आल्याने समाजात चर्चा सुरू झाली आहे. आपले प्रेम गमवायचे नसल्याने अमरेश आणि विजयलक्ष्मी यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. नवदाम्पत्याला शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांचे पुढील आयुष्य सुखी होवो अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे.