सार
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये शरमन जोशी एक संदेश देऊन जातो. फेरारी की सवारीमधील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
पुणे पोर्शे अपघाताबद्दल रोज नवीन अपडेट येत असल्याचे दिसून येत आहे. या अपघातात दोन आयटी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. अल्पवयीन आरोपीचे वडील, आई आणि आजोबा या सर्वांनाच अटक करण्यात आली आहे. या घडलेल्या घटनेतून कोणती शिकवण घेता येईल याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये मुलगा त्याच्या वडिलांकडून नियम कसे पाळायचे ते शिकतो.
काय सांगितले आहे व्हिडिओमध्ये -
व्हिडिओमध्ये अपघाताबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली आहे. 'फरारी की सवारी' चित्रपटामधील एक सिन यामध्ये दाखवण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आल्यानुसार एक बाबा त्याच्या मुलाला शाळेत घेऊन जाताना दिसतो. तेथे जाताना स्कुटीवरून तो सिग्नल तोडतो. त्यानंतर तो मुलाला आजूबाजूला कोणी पोलीस आहे का, हे विचारतो.
सिग्नल तोडल्यानंतर ते पुढे जातात आणि त्यामध्ये तो एका ट्राफिक पोलिसाजवळ येतो. त्याला तो सिग्नल तोडल्याचे सांगतो. त्यानंतर तो हवालदार कोणी पाहिलं का असं विचारतो. ट्राफिक हवालदाराने तुम्हाला पाहिले का असं विचारलं, त्यावर त्याने नाही असं उत्तर दिले. पुढे जाऊन तो मुलाने पाहिल्याचे सांगतो. त्यानंतर हवालदार गप्प झाल्याचे सांगतो.
व्हिडिओतून काय शिकायला मिळाले? -
व्हिडिओतून शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यामध्ये लहानपणापासून मुलांना शिकवण्यासारखं धडा मिळत असल्याचं दिसून येतो. लहानपणापासून मुलांना सिग्नल तोडून आपण चूक केल्याचे कबूल करण्याचे धाडस त्याच्या वडिलांनी सांगितले आहे. आपणही अशा प्रकारचे व्हिडीओ पाहून मुलांना शिकवायला हवे.
आणखी वाचा -
Lok Sabha election 2024 Exit Poll: पुन्हा एकदा मोदी सरकार, विरोधकांच्या आशांवर फेरलं पाणी; एक्झिट पोलमध्ये मोठा दावा
चीनला मिळाले मोठे यश, चंद्राच्या दूरवर उतरलेले चांग ई-6 अंतराळयान दोन दिवसांत करणार महत्वाचं 'हे' काम