FASTag Pass : राष्ट्रीय महामार्गावरून वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. NHAI ने फास्टॅग वार्षिक टोल पासच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2026 पासून हा पास 3,000 रुपयांऐवजी 3,075 रुपयांना मिळणार असून हा दर आर्थिक वर्ष 2026-27 साठी लागू राहणार आहे.

FASTag Pass : राष्ट्रीय महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिलपासून अधिक खर्च करावा लागणार आहे. NHAI ने फास्टॅग वार्षिक टोल पासच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार खासगी (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी उपलब्ध असलेल्या वार्षिक टोल पासची किंमत आता 3,075 रुपये करण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

टोल पासची नवी किंमत

NHAI ने दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2026 पासून वाहनधारकांना FASTag वार्षिक टोल पाससाठी 3,000 रुपयांऐवजी 3,075 रुपये द्यावे लागतील. हा नवीन दर आर्थिक वर्ष 2026-27 साठी लागू असणार आहे. हा पास केवळ वैध आणि सक्रिय FASTag असलेल्या खासगी वाहनांसाठी उपलब्ध आहे.

200 वेळा टोल क्रॉसिंग किंवा एक वर्षाची वैधता

नवीन नियमांनुसार, 3,075 रुपयांचा हा पास एक वर्ष किंवा 200 वेळा टोल क्रॉसिंगपर्यंत वैध असेल. यापैकी जे आधी पूर्ण होईल त्यानुसार पासची वैधता संपेल. म्हणजेच एका वर्षाच्या आत 200 वेळा टोल नाका ओलांडल्यास पासची मुदत संपल्याचे मानले जाईल.

टोल प्लाझांना NHAI चे निर्देश

NHAI ने सर्व टोल प्लाझा आणि संबंधित अधिकाऱ्यांना 1 एप्रिल 2026 पासून नवीन दर लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या बदलाची माहिती प्रवासी आणि वाहनधारकांना देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. दरवर्षी टोल शुल्काचे पुनरावलोकन केले जाते आणि त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून यावर्षी वार्षिक पासच्या किमतीत ही किरकोळ वाढ करण्यात आली आहे.