- Home
- India
- सुटीत दार्जिलिंग-सिलीगुडी-सिक्किमला जायचा विचार करताय? पावसाचा कहर, Darjeeling Landslide मध्ये 17 जणांचा मृत्यू, पर्यटन स्थळे सुरु आहेत का?
सुटीत दार्जिलिंग-सिलीगुडी-सिक्किमला जायचा विचार करताय? पावसाचा कहर, Darjeeling Landslide मध्ये 17 जणांचा मृत्यू, पर्यटन स्थळे सुरु आहेत का?
Darjeeling Landslide : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तेथील सर्व पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत.
14

Image Credit : Asianet News
पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन १७ जणांचा मृत्यू झाला. मिरिक आणि सुकिया पोखरी भागात भूस्खलन झाले. एक मोठा पूल पाण्यात वाहून गेला. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
24
Image Credit : social media
भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू
या दुर्घटनेत १७ जण मातीखाली दबून मरण पावले. जखमींना रुग्णालयात दाखल केले. दुर्गापूजेनंतर अनेक पर्यटक दार्जिलिंगला येतात, त्यामुळे अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
34
Image Credit : Asianet News
वाहतूक पूर्णपणे ठप्प
भूस्खलनामुळे बंगाल-सिक्कीम आणि दार्जिलिंग-सिलीगुडी मार्ग खराब झाले असून वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते आणि पूल वाहून गेल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.
44
Image Credit : Asianet News
सर्व पर्यटन स्थळे बंद
टायगर हिलसह सर्व पर्यटन स्थळे बंद आहेत. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. खासदार राजू बिस्ता यांनी परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे सांगितले.