Tata Motors Latest Update : लवकरच कर्जमुक्त होणार JLR, Tata Motorsची मोठी घोषणा

| Published : Jun 11 2024, 05:09 PM IST

Tata Motors

सार

Tata Motors Latest Update: पाहा काय म्हटलंय टाटा मोटर्सनं आणि काय होणार याचा फायदा.

 

Tata Motors Latest Update: टाटा मोटर्सच्या मालकीची कंपनी जेएलआर म्हणजेच जग्वार लँड रोव्हर या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जमुक्त होणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. कंपनीने फाईलिंग दरम्यान ही माहिती दिली. आर्थिक वर्ष २०२५ च्या अखेरीस जेएलआरचं कर्ज संपेल आणि कंपनी कर्जमुक्त होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. याशिवाय प्रवासी वाहने आणि व्यावसायिक वाहनांच्या विलीनीकरणाबाबतही निवेदन देण्यात आलं आहे. पुढील वर्षापर्यंत दोन्ही सेगमेंटचा व्यवसाय पूर्ण होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. याशिवाय कंपनीचा मार्केट शेअर २५ टक्क्यांपर्यंत ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. सध्या कंपनीचा मार्केट शेअर ११ टक्के असून तो २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेय.

मार्जिन वाढवण्यासाठी योजना

प्रवासी वाहनांचा बाजारातील हिस्सा १४ टक्क्यांवरून १८ ते २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचं उद्दिष्ट असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत प्रवासी वाहनांच्या कामकाजात १० टक्के (सध्या ६.५%) एबिटडाचे गायडंस टार्गेट आहे.

ईव्हीवर कंपनीचं लक्ष

याशिवाय पोर्टफोलिओमध्ये ईव्हीचा वाटा ३० टक्क्यांपर्यंत ठेवण्याचं उद्दिष्ट असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत ईव्ही ब्रेक-इव्हन एबिटडा साध्य करण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत पोर्टफोलिओमध्ये ईव्ही एन्ट्री १३% वरून ३०% पेक्षा अधिक वाढविण्याचं लक्ष्य आहे.

आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत १० ईव्ही वाहनांचा पोर्टफोलिओ असेल. सध्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये ५ इलेक्ट्रिक वाहनं आहेत, जी आर्थिक वर्ष २५-२६ पर्यंत १० ईव्हीपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य आहे. आर्थिक वर्ष २०२५-३० दरम्यान ईव्हीचे भांडवली खर्चाचे लक्ष्य १६००० ते १८००० कोटी आहे. येत्या २ वर्षात कंपनी ५० ईव्ही एक्सक्लुझिव्ह शोरूम उघडण्याची योजना आखत आहे.

विलीनीकरणाबाबतही निवेदन

प्रवासी वाहने आणि इलेक्ट्रिक वाहनांपाठोपाठ आता कंपनीचं लक्ष कमर्शिअल व्हेइकल सेगमेंटवर असून या सेगमेंटमध्ये अधिक काम करण्याची गरज आहे. एबिटडा मार्जिन दोन अंकी असेल आणि व्यावसायिक वाहन विभागाचा एफसीएफ महसुलाच्या ६-८ टक्के असेल, असं कंपनीनं म्हटलंय.