Budget Speech : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज १ फेब्रुवारीला देशाचा आर्थिक संकल्प संदेत सादर केला. यादरम्यान अर्थमंत्र्यांनी कॅन्सरचे रुग्ण ते शेतकरी वर्गासाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अशातच वाचा संपूर्ण भाषण...

Budget 2026 Speech : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला संसदेत देशाचा अर्थसंकल्प २०२६-२७ सादर केला. यंदा नवव्यांदा निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला असून त्यांनी भारताच्या इतिहासात एक रेकॉर्ड केला आहे. सदर अर्थसंकल्प मोदी सरकारच्या ३.० मधील तिसरा अर्थसंकल्प आहे. एवढेच नव्हे पहिल्यांदा अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश विकसित भारत @2047 मधील स्वप्न पूर्ण करण्याचा आहे. यामध्ये विकास, रोगजार, आत्मनिर्भरता आणि गरीबी दूर करण्यासह जागतिक आव्हानांना तोंड देण्यावर जोर देणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या अर्थसंकल्पाला 'रिफॉर्म एक्सप्रेस' असे म्हटले आहे. विकसित भारताच्या संकल्पासह अर्थमंत्र्यांनी आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात तरुण, महिला आणि शेतकऱ्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण इंग्रजीत संसदेत भाषण देतात. वाचा संपूर्ण बजेटचे भाषण

अर्थमंत्र्यांनी म्हटले की, जागतिक मार्केटशी जोडले जाणे आणि मजबूत आर्थिक क्षेत्र होणे हा उद्देश आहे. गरीब, तरुण आणि शेतकऱ्यांसह महिलांना हा अर्थसंकल्प मजबूत आणि आत्मनिर्भर होण्यास नक्कीच मदत करेल. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात १५ हजार सेकेंडरी शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये कंटेट क्रिएटर लॅब सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासोबत ७ हायस्पीड रेल्वे कॉरिडोअर आणि ३ आयुर्वेदिक एम्स उभारले जाणार असल्याचीही घोषणा केली आहे.