सार

भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्य क्षेत्रात मोठी सुधारणा करण्याचा प्रयत्न केलाय. याचाच परिणाम म्हणजे वर्ष 2021 मध्ये मोदी सरकारकडून आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेची सुरूवात करण्यात आली होती. 

Ayushman Bharat Digital Mission : भारतात भाजपच्या मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्या सरकारच्या काळात काही अद्वितीय विकास कामे केली आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारताला पुढील 23 वर्षांनंतर म्हणजेच वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचे लक्ष्य ठरविले आहे. अशातच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकारने घेतलेल्या देशाच्या हिताच्या निर्णयांपैकी एक म्हणजे आरोग्य क्षेत्रातील विकास. या क्षेत्राला सर्वप्रथम प्राधान्य देण्याचा मोदी सरकारने नेहमीच प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वर्ष 2021-22 पासून ते 2025-26 पर्यंतच्या पाच वर्षांसाठी 1600 कोटी रुपयांच्या डिजिटल हेल्थ इकोसिस्टम (Digital health ecosystem) तयार करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मोहिम सुरू केली होती. या मोहिमेला देशातील जनतेने उत्तम प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे. याशिवाय मोहिमेअंतर्गत 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत 56.67 कोटी नागरिकांनी आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (Ayushman Bharat Health Account) सुरू केले आहेत. याशिवाय आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेने लैंगिक समानता प्राप्त करण्याच्या दिशेनेही प्रगती केली आहे.

गेल्या महिन्यातील 29 फेब्रुवारी, 2024 पर्यंत 27.73 कोटी महिला आणि 29.11 कोटी पुरुषांनी आयुष्मान भारत हेल्थ अकाउंटचा लाभ घेतला आहे. याशिवाय 34.89 कोटींहून अधिक हेल्थ कागदपत्र या खात्याशी लिंक केले आहेत.

डिजिटल हेल्थ इकोसिस्टमची खासियत
डिजिटल हेल्थ इकोसिस्टम तयार करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेचा उद्देश असा आहे की, देशातील युनिफाइड डिजिटल हेल्थच्या पायाभूत सुविधांना पाठिंबा देण्यासाठी आवश्यक पाया घालण्याचा आहे. यामुळे ऑफलाइन पद्धतीने देखील आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ अकाउंट सुरू करण्यासाठी मदत केली जाऊ शकते.

याशिवाय भारत सरकारकडून आरोग्याच्या उत्तम सुविधेसाठी आयुष्मान भारत मोहिमेचे अ‍ॅप आणि आरोग्य सेतुसारखे (Aarogya Setu) वेगवेगळे अ‍ॅपही लाँच केले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना वैद्यकिय उपचारासाठी मदत मिळून शकते. आयुष्मान भारतच्या अ‍ॅपमध्ये नागरिकांना त्यांचे वैद्यकीय कागदपत्र सुरक्षित सेव्ह करण्याची सुविधाही मिळते.

आयुष्मान भारत डिजिटल मोहिम योजना
आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेसारखी कल्याणकारी योजनांमुळे देशातील सर्वसामान्यांना वैद्यकिय क्षेत्रात फार मोठी मदत होते. याशिवाय आतापर्यंत 2.35 लाख आरोग्य सुविधांचे व्हेरिफिकेशन आयुष्मान भारत हेल्थ अकाउंटच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यामध्ये खासगी वैद्यकीय केंद्रांची संख्या 69,633 असून 1.66 लाखांहून अधिक शासकीय केंद्रांची संख्या आहे.

आणखी वाचा : 

'आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की, आता आम्ही इकडे तिकडे जाणार नाही', मुख्यमंत्री नितीश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आश्वासन

'बंगालची महिला शक्ती दुर्गा म्हणून उभी राहिली', संदेशखळीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीएमसी आणि ममता बॅनर्जींवर केली टीका

भारतातील गरिबी संपली, The World Poverty Clock च्या अहवालात गरिबी 3 टक्क्यांहून कमी असल्याची मिळाली माहिती