सार

Ayodhya Ram Temple : श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टने श्री राम मंदिराचा अतिशय सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मंदिरामध्ये केलेली दिव्यांची रोषणाई या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

 

Ayodhya Ram Temple : अयोध्येमध्ये उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरातील रामलला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे. श्री राम मंदिराच्या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यासाठी सुमारे 8 हजार पाहुण्यांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. 

नुकतेच श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने श्री राम मंदिराचा एक अतिशय सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मंदिरामध्ये दिव्यांची रोषणाई करून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. हा सुंदर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

मंदिराची भव्यता दाखवणारा मनमोहक व्हिडीओ

रात्रीच्या वेळेस संपूर्ण मंदिर दिव्यांनी सजवल्याचा व्हिडीओ ट्रस्टने जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरील गरूड, हनुमान, हत्तीची शिल्पे, राम मंदिराचा आतील भाग, गर्भगृह, बाहेरील भाग, तळमजल्यावरील सजावट, सुंदर नक्षीकाम पाहायला मिळत आहे.

16 जानेवारीपासून सुरू होणार कार्यक्रम

22 जोनवारीला श्री राम मंदिरामध्ये रामलला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यासाठी 16 जानेवारीपासूनच विधी आणि पूजेस सुरुवात करण्यात येणार आहे.

श्री राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत रॉय यांनी सांगितले की, दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवव्या रामनवमीला दुपारी 12 वाजता सूर्यदेव स्वतः आपल्या किरणांनी प्रभू राम यांच्या कपाळाला स्पर्श करतील.

दरम्यान या सोहळ्यासाठी देश-परदेशातील दिग्गज उपस्थिती दर्शवणार आहेत. या सोहळ्याकडे देशवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

आणखी वाचा :

राम मंदिर उभारणीमध्ये सर्वात मोठे आव्हान कोणते होते? या व्यक्तीने केला खुलासा

राम मंदिर उभारणीत वापरलेल्या प्रत्येक दगडाचे 5 प्रकारे करण्यात आले परीक्षण, वाचा सविस्तर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी पाठवण्यात आल्या तब्बल 42 घंटा, पाहा भाविकांनी कशी केली पूजा