TVK Tsuanmi in Tamil Nadu : अभिनेता विजयच्या राजकीय यशाची भविष्यवाणी करणारे प्रसिद्ध ज्योतिषी राधन पंडित त्याच्या घरी पोहोचले. विजयचा पक्ष 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) निवडणुकीत चांगली कामगिरी करत असतानाच ही भेट झालीये. या भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने फॅन्स आणि राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.
TVK Tsuanmi in Tamil Nadu : ज्या ज्योतिष्याने अभिनेता-राजकारणी विजयच्या राजकीय यशाची भविष्यवाणी केली होती, तेच प्रसिद्ध ज्योतिषी राधन पंडित आता थेट विजयच्या घरी पोहोचले आहेत. त्यांच्या हातात फुलांचा गुच्छ आणि शाल होती. विजयचा पक्ष 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) तामिळनाडूमध्ये चांगली कामगिरी करत असल्याच्या सुरुवातीच्या कलांमध्येच ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
पंडित यांच्या विजयच्या घरी येण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामुळे चाहते आणि राजकीय विश्लेषकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या व्हिडिओमध्ये पंडित आपल्या गाडीतून उतरून फुलं, शाल आणि इतर भेटवस्तू घेऊन घरात जाताना दिसत आहेत. निवडणुकीचे सुरुवातीचे कल विजयच्या बाजूने असतानाच ही भेट झाल्याने ऑनलाइन चर्चांना आणखी जोर आला आहे.
विजयच्या चाहत्यांनी लगेचच पंडित यांच्या जुन्या भविष्यवाणीशी या भेटीचा संबंध जोडला आहे. अनेक जण या भेटीकडे एका ऐतिहासिक राजकीय पदार्पणावर शिक्कामोर्तब म्हणून पाहत आहेत.
व्हायरल व्हिडिओ पाहा
सोशल मीडियावर तर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. एका युझरने म्हटलंय की, विजय मुख्यमंत्री नाही झाला तरी तो विरोधी पक्षनेता नक्कीच होऊ शकतो, जो पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्यासाठी एक मोठी कामगिरी असेल. याच युझरने राज्यातील सध्याच्या राजकीय आघाड्यांना 'स्ट्रॅटेजिकली चुकीचं' ठरवत टीका केली आहे.
दुसऱ्या एका युझरने या परिस्थितीला 'पूर्णपणे अविश्वसनीय' (utter insanity) म्हटलं आहे. पहिल्याच प्रयत्नात एक चित्रपट स्टार निवडणुकीत इतकं वर्चस्व गाजवेल, असं आजच्या राजकारणात क्वचितच पाहायला मिळतं, असंही त्याने नमूद केलं.
सुरुवातीच्या कलांमध्ये TVK आघाडीवर
तामिळनाडूमधून येणारे सुरुवातीचे कल अत्यंत चुरशीची लढत दाखवत आहेत. विजयच्या नेतृत्वाखालील 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) अनेक मतदारसंघांमध्ये एक महत्त्वाचा पक्ष म्हणून समोर येत आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, हा नवीन पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) यांसारख्या प्रस्थापित पक्षांची मतं खात आहे.


