सार

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला तर जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यात भाजपला अपयश आले. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले आहे. 

  1. मुंबईत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतीत १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यास राष्ट्रीय आयोगाने परवानगी दिली. या महाविद्यालयांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे केले जाणार आहे.

2. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग परिसरात मंगळवारी दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या प्रादेशिक लष्कराच्या जवानाचा मृतदेह सापडला आहे. कालपासून हा सैनिक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती आणि सुरक्षा दलांकडून परिसरात शोध मोहीम सुरू होती.

3. हरियाणमध्ये भाजपने सर्वांचा धुव्वा उडवत धडाकेबाज विजय मिळवला तर जम्मू-काश्मीरमध्ये मात्र भाजपला सरकार स्थापन करता आलेलं नाही. तेथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळालं आहे. या संपूर्ण निकालावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून भाष्य करण्यात आलं.