सार

भारतातील न्यायव्यवस्था कमकुवत करण्यात प्रयत्न होत आहे या प्रकरणी लक्ष घालण्यात यावे यासाठी तब्बल २१ निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.कोणते माजी न्यायाधीश आहेत जाणून घ्या. 

दिल्ली :  21 निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करून तिला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या असल्याचं त्यांनी पत्राद्वारे म्हटलं आहे. न्यायव्यवस्था अशा दबावापासून दूर ठेवणं गरजेचं आहे. तसंच न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेबाबतही पत्रात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

काही तत्वं राजकीय हित आणि त्यांच्या वैयक्तिक फायद्यांसाठी न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. या पत्रावर ज्या 21 न्यायाधीशांच्या सह्या आहेत, त्यात सर्वोच्च न्यायालयाचे चार माजी न्यायाधीश आणि उच्च न्यायालयांचे 17 माजी न्यायाधीश यांचा समावेश आहे.भ्रष्टाचारप्रकरणी काही विरोधी नेत्यांवर कारवाई करण्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिले आहे.

आम्हाला प्रामुख्यानं दिशाभूल करणारी माहिती आणि न्यायपालिकेच्या विरोधात जनतेच्या भावनांबाबत चिंता आहेत. हे फक्त अनैतिकच नाही तर लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांच्या विरोधीही आहे, असं पत्रात म्हटलं आहे. पत्रावर सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश दीपक वर्मा, कृष्णा मुरारी, दिनेश माहेश्वरी, एम.आर. शाह यांच्या सह्या आहेत. त्याशिवाय हायकोर्टाच्या 17 न्यायाधीशांच्या सह्या आहेत.

या माजी न्यायाधीशांनी लिहिले पत्र :

हे पत्र लिहिणाऱ्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे चार माजी न्यायमूर्ती (दीपक वर्मा, कृष्णा मुरारी, दिनेश माहेश्वरी आणि एमआर शाह) यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. याशिवाय १७ माजी न्यायमूर्ती हे वेगवेगळ्या उच्च न्यायालयांशी संबंधित आहेत. यामध्ये प्रमोद कोहली, एस. एम.सोनी, अंबादास जोशी, एस.एन. धिंग्रा, आरके गौबा, ज्ञान प्रकाश मित्तल, अजित भरिहोके, रघुवेंद्र सिंग राठोड, रमेश कुमार मेरुतिया, करम चंद पुरी, राकेश सक्सेना आणि नरेंद्र कुमार. या यादीत उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राजेश कुमार, एसएन श्रीवास्तव, पीएन रवींद्रन, लोकपाल सिंह आणि राजीव लोचन यांचीही नावे आहेत.

आणखी वाचा :