- Home
- Entertainment
- प्रणित मोरे 'या' प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बहिणीच्या पडल्या प्रेमात, वाचून म्हणाल भावा तुलाच जमलं!
प्रणित मोरे 'या' प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बहिणीच्या पडल्या प्रेमात, वाचून म्हणाल भावा तुलाच जमलं!
स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे बिग बॉसच्या घरात परतला आहे, ज्यामुळे बहुतेक सदस्य आनंदी झाले. विशेषतः मालती चहरला खूप आनंद झाला असून, तिने प्रणितला मिठी मारली आणि तू गेल्यावर खूप आठवण आल्याचे सांगितले.

प्रणित मोरे 'या' प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बहिणीच्या पडल्या प्रेमात, वाचून म्हणाल भावा तुलाच जमलं!
शुक्रवारी बिग बॉसच्या घरात एक नवीन गोष्ट झालेली पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी घरातून बाहेर गेलेला स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे हा परत एकदा घरी आला आहे.
प्रणीतला घरात पाहून कोणाला आनंद झाला?
प्रणितला पुन्हा घरात पाहून तान्या आणि फरहाना सोडून सगळेच खूश झाल्याचं पाहायला मिळालं. गौरव खन्ना आणि मृदुल आपल्या मित्राला पाहून भलतेच आनंदी झाले.
मालतीला झाला सर्वात जास्त आनंद
मालती चहरला यावेळी सर्वात जास्त आनंद झाल्याचं दिसून आलं. मालती ही प्रणित बाहेर गेल्यामुळं प्रचंड नाराज झाली होती. तो घरात नव्हता तरीही मालती ही त्याच्याबद्दल चर्चा करताना दिसून यायची.
मालती काय म्हणाली होती?
मालती असंही म्हणाली होती की, प्रणित असला की घरात सकारात्मक वातावरण असतं. आता प्रणितला पाहून मालती भावुक झाली आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ती प्रणितला हग करताना दिसतेय.
दोघांचा एक व्हिडीओ झाला व्हायरल
मालती आणि प्रणित दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघे एकत्र जेवत असून गप्पा मारताना दिसून आले आहेत.
मालती प्रणीतला काय म्हणते?
मालती प्रणितला बोलताना दिसते की, तू गेला होता तेव्हा मला तुझी खूप आठवण आली होती.तसंच मालती प्रणितला सल्ला देते की, मनात आहे ते सगळं बोलून टाक म्हणजे त्रास होणार नाहीये.

