राष्ट्रीय पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये आयोजित करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला असून, ७२ वर्षांची परंपरा मोडण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर, अभिनेते परेश रावल यांनी या निर्णयाचे समर्थन करत असे सोहळे देशाच्या विविध शहरांमध्ये व्हायला हवेत, असे म्हटले आहे.

दिल्ली: गुजरातला राष्ट्रीय पुरस्कार सोहळा नेण्यावरून वाद प्रतिवाद रंगले आहेत. यावर राजकीय आणि सिने इंडस्ट्रीतील लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. त्यांनी ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा हा सोहळा गुजरातमध्ये होत असल्याचा दावा केला.

परेश रावल काय म्हणाले? 

परेश रावल यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, गुजरात काय पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये आहे का? ते आपल्याच देशाचा एक अविभाज्य घटक आहे. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम गुजरातमध्ये का होऊ नये असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. असे सोहळे देशातील विविध शहरांमध्ये व्हायला हवेत असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी परखड मत केलं व्यक्त 

याबद्दल राज ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची दिल्लीतील परंपरा मोडण्यामागे कारण काय आहे असं विचारलं. त्यांनी महाराष्ट्रात हा पुरस्कार सोहळा का आयोजित केला जात नाही प्रश्न विचारला. शहर बदलण्याचा निर्णय हा पुरस्कार सोहळ्याशी जोडलेल्या परंपरेचा भाग असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे.