संतोष डावखर दिग्दर्शित 'गोंधळ' या मराठी चित्रपटाची ऑस्कर २०२७ साठी निवड झाली आहे. या चित्रपटाची कथा एका विवाहित महिलेभोवती फिरते, जी पती आणि गोंधळी कलाकारांशी संबंधित एका प्रकरणात अडकते. हा एक थरारपट असून यात किशोर कदम आणि इतर कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानाची गोष्ट घडली आहे. गोंधळ या चित्रपटाची ऑस्कर २०२७ साठी निवड झाली आहे. याबाबतची घोषणा फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. या चित्रपटात थ्रिलर भाग दाखवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील गोंधळ पद्धतीला केंद्रस्थानी ठेवून तो बनवण्यात आला आहे.

चित्रपटाची कहाणी महिलेभोवती फिरते 

या चित्रपटाची कहाणी एका लग्न झालेल्या महिलेभोवती फिरते. पती आणि गोंधळी कलाकारांशी संबंधित एका प्रकरणात ती अडकते. त्यानंतर या चित्रपटाचा थ्रिलर वाढत जातो. त्यातून भावनिक आणि मानसिक दृष्टया माणसाची स्टोरी रंगत जात असते. या चित्रपटात मराठी कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे.

कोण आहेत कलाकार? 

या मराठी चित्रपटात किशोर कदम, इशिता कदम, योगेश सहानी आणि निषाद भोईर यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. याच लेखन आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केलं. ३३ चित्रपटांच्या प्रवेशिकांमधून याची निवड करण्यात आली. १४ मार्च २०२७ रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे.