- Home
- Entertainment
- Tamannaah Bhatia Aadhaar Card : आधार कार्डवर असा भारी फोटो? तमन्नाचा फोटो पाहून चाहते अवाक्
Tamannaah Bhatia Aadhaar Card : आधार कार्डवर असा भारी फोटो? तमन्नाचा फोटो पाहून चाहते अवाक्
तमन्ना भाटिया आधार कार्ड फोटो: स्वतःच्या आधार कार्डवरचा फोटो पाहिला की बहुतेकांना लाज वाटते. पण अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या आधार कार्डवरचा फोटो पाहून नेटकरी मात्र थक्क झाले आहेत.
यावेळी हातातल्या 'आधार कार्ड'ने वेधलं लक्ष
दाक्षिणात्य आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया नेहमीच तिच्या फॅशन आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे चर्चेत असते. नुकतंच तिने पापाराझींना हसून पोझ दिली. पण यावेळी सर्वांचं लक्ष तिच्या लूकने नाही, तर तिच्या हातातल्या 'आधार कार्ड'ने वेधून घेतलं.

आधार कार्ड हातात घेऊनच कॅमेऱ्याला पोझ
विमानतळावर जाण्याच्या घाईत असलेल्या तमन्नाने हातात आधार कार्ड घेऊनच कॅमेऱ्याला पोझ दिली. नेटकरी आणि पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, सध्या तो तुफान व्हायरल होत आहे.
लोकांचा नेहमीचाच अनुभव
आधार कार्डवरचा फोटो म्हणजे अनेकांसाठी लाजिरवाणी आणि हसू आणणारी गोष्ट असते. "माझ्या आधार कार्डवरचा फोटो पाहून मलाच भीती वाटते", "जगातला सर्वात वाईट कॅमेरा आधार केंद्रावर असतो" अशी लोक नेहमीच खिल्ली उडवतात. माणूस कितीही सुंदर असला तरी आधारच्या कॅमेऱ्यासमोर फोटो विचित्रच येतो, हा ९९ टक्के लोकांचा अनुभव आहे.
तमन्ना भाटिया दिसतेय खूपच क्युट
पण तमन्ना भाटियाच्या बाबतीत मात्र हे अगदी उलट घडलं आहे! व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तमन्नाच्या हातातल्या आधार कार्डवरचा फोटो स्पष्ट दिसत आहे. त्या छोट्याशा ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्येही ती तितकीच सुंदर आणि क्युट दिसत आहे.
नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी, "आधार कार्डवरही छान दिसणारी एकमेव मुलगी म्हणजे तमन्ना", "क्या आपके आधार कार्ड मे अच्छा फोटो है?" अशा मजेशीर कॅप्शन्स देऊन व्हिडीओ शेअर केला आहे.
"आपलं आधार कार्ड पाहिलं की आपण स्वतःलाच ओळखू शकत नाही, पण तमन्ना मात्र आधारवरही मिल्की ब्युटीसारखी चमकत आहे", "अप्सरा कोणत्याही कॅमेऱ्यासमोर सुंदरच दिसतात" अशा कमेंट्स करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. एकंदरीत, तमन्नाच्या या छोट्याशा आधार कार्ड व्हिडीओने इंटरनेटवर सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे.
