सलमान खानने 'बिग बॉस २०' मध्ये शर्टलेस होत बॉडी शेमिंग आणि ऑनलाइन ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिलं. कतरिना कैफचं नाव न घेता त्याने गरोदरपणानंतर महिलांवर होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला. तसेच, स्वतःच्या वयावरून ट्रोल करणाऱ्यांनाही त्याने खडेबोल सुनावले.
मुंबई : सलमान खानने नुकतंच बिग बॉस २० च्या एका एपिसोडमध्ये शर्टलेस होत ऑनलाइन ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगवर जोरदार टीका केली. गरोदरपणानंतर महिलांच्या वाढलेल्या वजनावरून आणि दिसण्यावरून त्यांना कसं टार्गेट केलं जातं, यावर त्याने स्पष्ट मत मांडलं. सलमानने थेट कतरिना कैफचं नाव घेतलं नाही, पण प्रेक्षकांनी त्याचा हा मुद्दा कतरिनाच्या वाढलेल्या वजनावरून तिला केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगशी जोडला.
बाळंतपणानंतर महिलांच्या वाढलेल्या वजनावर टीका का केली जाते, असा सवाल त्याने विचारला. गरोदरपणात वजन वाढणं ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया असल्याचं तो म्हणाला. "प्रेग्नंट झाल्यानंतर प्रत्येकाचं वजन वाढतं," असं सलमानने स्पष्ट केलं.
व्हायरल व्हिडीओ: महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चिनी भाजीवाला करतो मेकअप! (पाहा)
सलमानने पुढे सांगितलं की, नवीन मातृत्वात असलेल्या आई कामावर परतण्यापूर्वी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेऊ शकतात. जेव्हा त्या पुन्हा कामाला सुरुवात करतील, तेव्हा त्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करू शकतात. ऑनलाइन ट्रोल करणाऱ्यांचा समाचार घेताना सलमान म्हणाला की, एखाद्याच्या शरीराची, दिसण्याची किंवा मातृत्वाची खिल्ली उडवणं हे त्या व्यक्तीचे संस्कार कसे आहेत हे दाखवून देतं.
स्वतःच्या वयावरून आणि दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांनाही सलमानने उत्तर दिलं. तो म्हणाला की, वयाच्या ६० व्या वर्षी मी 'मैने प्यार किया' मधल्या सलमानसारखा दिसावा, अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. खोट्या ओळखीचा वापर करून सेलिब्रिटींवर टीका करणाऱ्यांवरही त्याने निशाणा साधला. तो म्हणाला की, अशा नकारात्मक गोष्टींचा त्याच्यावर किंवा इतर स्टार्सवर काहीही परिणाम होत नाही, कारण त्यांच्या चाहत्यांचा त्यांना नेहमीच भक्कम पाठिंबा असतो.

