2026 च्या एमी अवॉर्ड्समध्ये सेलेना गोमेझचा लूक पाहून चाहते चांगलेच गोंधळले आहेत. तिचे विस्कटलेले केस आणि डोळ्यांची विचित्र हालचाल पाहून, 'ही खरी सेलेना नसून तिची डुप्लिकेट (क्लोन) आहे' अशी चर्चा सोशल मीडियावर पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
गायिका आणि अभिनेत्री सेलेना गोमेझ 14 सप्टेंबर रोजी 2026 च्या एमी अवॉर्ड्समध्ये पोहोचली, आणि सोशल मीडियावर जणू भूकंपच आला. तिचा लूक आणि वागणं पाहून चाहते इतके गोंधळले की तिच्या खऱ्या ओळखीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. अनेकांनी तर थेट 'ही सेलेना नसून तिची डुप्लिकेट (क्लोन) आहे' असं म्हणायला सुरुवात केली आहे.
चाहत्यांच्या नजरेतून काहीच सुटत नाही
सेलेनाबद्दल अशा चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या बदलत्या लूक, वागण्या-बोलण्यावरून आणि आवाजावरूनही अशा थिअरीज मांडल्या जात आहेत. मनोरंजन क्षेत्रातील महिला कलाकारांवर लोकांचं बारीक लक्ष असतंच, पण सेलेनाभोवती 'क्लोन' असल्याच्या चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीत.
तिच्या चेहऱ्यातील लहान-सहान बदलांपासून ते करिअरमधील निर्णयांपर्यंत, प्रत्येक गोष्टीची नोंद काही ऑनलाइन ग्रुप्सनी ठेवली आहे. त्यांच्या मते, तिच्या वागण्यात होणारे बदल, म्हणजे कधी एकदम उत्साही दिसणं तर कधी एकदम शांत होणं, हे या गोष्टीचा 'पुरावा' आहे की तिची जागा दुसऱ्या कोणीतरी घेतली आहे. याच कारणामुळे 2026 च्या एमी अवॉर्ड्सनंतर पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं आहे.
चाहत्यांनी काय हेरलं?
अवॉर्ड सोहळ्यानंतर सोशल मीडियावर सेलेनाबद्दलच्या कमेंट्सचा पूर आला. अनेकांनी तिच्या 'डोळ्यांच्या विचित्र हालचाली'कडे (twitching eyes) लक्ष वेधलं. 'तिला झालंय तरी काय?' असा प्रश्न अनेक जण विचारत होते. काहींना तिचे कंबरेपर्यंत येणारे 'सॉफ्ट, फ्लोइंग मरमेड वेव्हज' स्टाईल केस आवडले, तर काहींना ते 'न विंचरलेले' (uncombed hair) वाटले. तिच्या या बदललेल्या लूकमुळे चाहते चक्रावून गेले.
14 सप्टेंबरच्या या कार्यक्रमानंतर सेलेनाचं नाव अनेक तास ट्रेंडिंग होतं. हजारो युझर्स तिच्या रेड कार्पेट वॉकपासून ते स्पीचपर्यंत प्रत्येक फ्रेमचं विश्लेषण करत होते. काहींनी तर तिच्या चेहऱ्याच्या ठेवणीत बदल झाल्याचंही म्हटलं.
केसांपलीकडे जाऊन काही युझर्सनी कॉस्मेटिक सर्जरीबद्दलही अंदाज लावला. एका फॅनने लिहिलं, 'नक्कीच बोटॉक्सचा (Botox) नवीन पण वाईट डोस घेतला असणार.' तर दुसऱ्याने तिच्या 'कपाळाजवळ केलेल्या विचित्र मेकअप'मुळे (odd contouring) तिचा चेहरा 'थोडा वेगळा' दिसत असल्याचं म्हटलं. रेडिटवर एका युझरने लिहिलं, 'तिच्या डोळ्यांची हालचाल बघा. मेकअप नसतानाही ते स्पष्ट दिसतं.'
'क्लोन' असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण
हा गोंधळ इतका वाढला की, 'ही तिची डुप्लिकेट आहे का?' (Is That Her Clone?) असा प्रश्न विचारला जाऊ लागला. काही चाहत्यांनी तर दावा केला की, सेलेना गोमेझचा 2017 च्या आसपास मृत्यू झाला असून, तिची जागा एका क्लोनने घेतली आहे. हॉलिवूडच्या काही मोठ्या लोकांनी तिचं करिअर सुरू ठेवण्यासाठी हा बनाव रचल्याचं या थिअरीमध्ये म्हटलं जातं.
एका फॅनची कमेंट या सगळ्या चर्चांचं सार सांगते, 'ती आता पूर्वीची सेलेना राहिलेली नाही, फक्त एक 'इन्स्टा फेस' क्लोन बनली आहे.' या थिअरीजमध्ये तिच्या स्वभावात, लूकमध्ये आणि वागण्यात झालेले बदल हेच 'पुरावे' म्हणून सांगितले जातात. अर्थात, सेलेना गोमेझने यापूर्वी अशा चर्चांना गंमतीत घेत उत्तर दिलं आहे.
एमी अवॉर्ड्समधील तिच्या लूकमुळे पुन्हा एकदा हेच सिद्ध झालं आहे की, प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यात, विशेषतः त्यांच्या दिसण्यातील बदलांवरून कशाप्रकारे विचित्र थिअरीज आणि चर्चा सुरू होऊ शकतात.
