इब्राहिम अली खानने त्याची 'अप्पा जान' सारा अली खानसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्याने साराला 'जगातली बेस्ट बहीण' म्हटलंय. तर, करीना कपूरनेही तिला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. कामाबद्दल बोलायचं झाल्यास, सारा लवकरच 'उडता तीर' या सिनेमात दिसणार आहे.

सारा अली खानच्या वाढदिवसानिमित्त तिचा भाऊ इब्राहिमने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने साराला 'अप्पा जान' म्हणत शुभेच्छा दिल्या. "माझ्या अप्पा जानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा (हार्ट इमोजी). माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि जगातली बेस्ट बहीण असल्याबद्दल थँक्यू," असं त्याने लिहिलं आहे. यासोबतच इब्राहिमने सारासोबतचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे, ज्यात दोघं शेकोटीसमोर बसलेले दिसत आहेत.

याआधी, करीना कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये करीना, तिचा पती सैफ अली खान, सैफचा मुलगा इब्राहिम अली खान आणि सारा दिसत आहेत. या फोटोसोबत करीनाने साराला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या. तिने लिहिलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा, सारा डार्लिंग... अजून जास्त भोपळ्याची भाजी आणि आता दही खाण्यासाठी... तुझं ताट नेहमी भरलेलं राहो..."

सारा ही सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी आहे. करीसोबत तिचे संबंध खूप चांगले असून, ती अनेकदा तिचं कौतुक करताना दिसते.

सारा अली खानच्या कामाबद्दल

कामाबद्दल बोलायचं झाल्यास, सारा लवकरच तिच्या 'उडता तीर' या नव्या सिनेमाच्या तयारीत आहे. या सिनेमात तिच्यासोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे. धर्मा प्रॉडक्शन्स आणि सिख्या एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेला हा सिनेमा ९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. आधी हा सिनेमा सप्टेंबरमध्ये रिलीज होणार होता.

सिनेमाच्या निर्मात्यांच्या मते, 'उडता तीर' हा "विनोद, गोंधळ आणि संपूर्ण कुटुंबासाठी एक मनोरंजक कथा" घेऊन येत आहे.

'उडता तीर'ची टीम आणि कलाकार

या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन आकाश ए. कौशिक यांनी केलं असून, दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. करण जोहर, अदर पूनावाला, अपूर्व मेहता, गुनीत मोंगा कपूर आणि अचीन जैन यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

'उडता तीर'मुळे सारा आणि आयुष्मान 'पती पत्नी और वो दो' नंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या सिनेमात रकुल प्रीत सिंग आणि वामिका गब्बी यांच्याही भूमिका होत्या.