सचिन पिळगावकरांनी त्यांची मुलगी श्रिया हिच्या 'मंडला मर्डर्स' या वेबसिरीजमधील भूमिकेचे कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या कामाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात फेव्हरेट कपल समजलं जात. आजपर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्यांची मुलगी श्रिया ही प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते, तिच्याबद्दल सचिन यांनी पोस्ट टाकली असून ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे.
सचिन यांनी श्रियाची वेबसिरीज पहिली असून त्यानंतर तीच वडिलांनी कौतुक केलं आहे. मंडला मर्डर्स नावाची वेबसिरीज पाहिल्यानंतर इंस्टाग्रामवर सचिन यांनी लेकीचे कौतुक केलं आहे. त्यांनी यावेळी तिचे वेब सिरींजमधील काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी लिहिताना सचिन यांनी आपल्या मुलीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सचिन काय म्हणाले?
सचिन पिळगावकर यांनी बोलताना म्हटलं आहे की, तुला जे काही प्रेम मिळत आहे, त्याबद्दल अभिनंदन श्रिया. तू साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून तुझी क्षमता दिसत आहे. आम्हाला तुझ्या कामाबद्दल खूप अभिमान आहे. तू साकारलेली रुख्मिणी ही भूमिका खूप वेगळी असून तू त्या भूमिकेला न्याय देण्याचं काम केलं आहे.
तू दाखवून दिल की काही सीनमुळे सुद्धा एक कलाकार त्याच्या कामाची छाप मागे सोडू शकतो. यावेळी सचिन यांनी पत्नी सुप्रिया यांच्यासोबतच काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी दोघांनी मिळून एकमेकांचं कौतुक केलं आहे. ही वेब सिरीजमध्ये ओटीटीवर लॉन्च करण्यात आली आहे. सचिन आणि सुप्रिया यांनी दोघांनी मुलीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
