अमिताभ बच्चन यांच्यासह या 7 टॉप हिरोंना रेखाने केलंय डेट, लग्नानंतरही होतं अफेअर!
Rekha dated Amitabh Bachchan : रेखाच्या अफेअर्सची चर्चा बॉलिवूडमध्ये नेहमीच होत असते. तिचं नाव अमिताभ बच्चनपासून जितेंद्रसारख्या सुपरस्टार्ससोबत जोडलं गेलं आहे. पण, कोणतंच नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. चला तर मग पाहूया अफेअर्सची संपूर्ण यादी...

अमिताभ बच्चन
रेखाचं मन अमिताभ बच्चन यांच्यावर जडलं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले होते, पण अमिताभ आधीच विवाहित होते, त्यामुळे हे नातं फार काळ टीकू शकलं नाही. जया बच्चन यांचा या नात्याला प्रखर विरोध होता.
जितेंद्र
रेखाचं नाव जितेंद्रसोबत जोडलं गेलं होतं. पण, त्यांचं हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही.
किरण कुमार
रेखाने काही महिने किरण कुमारलाही डेट केलं होतं, पण किरणचे वडील जीवन यांच्यामुळे तिचं हे नातं लवकरच संपलं.
विनोद मेहरा
किरण कुमारपासून वेगळं झाल्यानंतर रेखाचं मन विनोद मेहरावर जडलं. पण, तिचं हे नातंही फार काळ टिकलं नाही.
मुकेश अग्रवाल
यानंतर रेखाने व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं. पण, लग्नाच्या काही काळानंतर त्यांनी आत्महत्या केली. यामागे नेमकं काय कारण होतं, हे कोणालाच माहीत नाही.
अक्षय कुमार
रेखाचं नाव अक्षय कुमारसोबतही जोडलं गेलं आहे. पण, दोघांनीही या नात्यावर कधीच मौन सोडलं नाही. दोघांना काही चित्रपटांमध्ये सोबत काम केलं. त्यात त्यांनी बरेच भडक सीन दिले होते.
संजय दत्त
या यादीत संजय दत्तच्या नावाचाही समावेश आहे. पण, संजयने ही बातमी अफवा असल्याचं म्हटलं होतं. रेखाने याबाबत कधी अवाक्षरही काढला नाही.

