प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या अमृतसरमधील घरावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि पळून गेले. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून तपास सुरू आहे.
Kapil Sharma house attack: पंजाबमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या अमृतसरमधल्या घरावर अंदाधुंद गोळीबार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाईकवरून आलेल्या काही हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि तिथून पळ काढला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहे. कपिलच्या घरावर हा गोळीबार कोणी आणि का केला, याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला
गोळीबाराची माहिती मिळताच, मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जिल्ह्याचे एसपी आणि इतर मोठे अधिकारीही तिथे पोहोचले. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. कोणालाही आत-बाहेर जाण्याची परवानगी नाही. मीडियालाही दूर ठेवण्यात आलं आहे. पोलीस आजूबाजूच्या लोकांची आणि सिक्युरिटी गार्डची चौकशी करत आहेत. तसेच, परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
कपिल शर्माकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
या हल्ल्याबद्दल कपिल शर्माकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्याच्या टीममधील कोणीही याबाबत माहिती दिलेली नाही. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा घरात कोण-कोण होतं, याची माहिती पोलीस गोळा करत आहेत. कपिल शर्माचा असा कोणता शत्रू आहे, ज्याने हे कृत्य केलं असेल, याचा पोलीस तपास करत आहेत. कपिल आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहतो, हे सर्वांनाच माहीत आहे.
कपिल शर्माचं घर अमृतसरच्या पॉश भागात
अमृतसरमध्ये ज्या ठिकाणी कपिल शर्माचं घर आहे, तो शहरातला सगळ्यात पॉश भाग मानला जातो. या भागात शहरातले मोठे आणि श्रीमंत लोक राहतात. अनेक मंत्री, आमदार आणि मोठमोठ्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांची घरंही याच परिसरात आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा अधिक गांभीर्याने तपास करत आहेत.
