हजारो कोटींचा मालक, तरीही सलमान खान 1 BHK घरात का राहतो?

| Published : Apr 16 2024, 05:37 PM IST

Salman khan house

सार

आजच्या घडीला हजारो कोटींचा मालक असलेला सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये का राहतो? असा प्रश्न त्याच्या बहुसंख्य चाहत्यांना पडला आहे. जाणून घ्या काय आहे कारण गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये राहण्याचे

सलमान खान गेली अनेक वर्षे वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. भाईजानच्या घरी नेहमीच अनेक सेलिब्रिटींचा गोतावळा असतो. त्याच्या घरी अनेक कलाकार भेट देत असतात. आजच्या घडीला हजारो कोटींचा मालक असलेला सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये का राहतो? असा प्रश्न त्याच्या बहुसंख्य चाहत्यांना पडला आहे. मुख्य कारण म्हणजे सलमानचे आई-वडील आहेत. आई सलमा खान यांच्या जवळ राहता यावे म्हणून सलमान गेल्या अनेक वर्षांपासून या छोट्या फ्लॅटमध्ये राहत आहे.

गॅलेक्सी अपार्टमेंट पुन्हा का आले चर्चेत :

सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर ही घटना घडली असून या प्रकरणातील आरोपीना गुजरातमधून अटक देखील करण्यात आली आहे. तसेच आरोपीना १० दिवसांनी पोलीस कोठडी सुनावली आहे.

नक्की काय घडले होते?

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर बाइकवरून आलेल्या दोघांनी रविवारी (14 एप्रिल) गोळीबार केला होता. गोळीबार केल्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर मुंबई पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात झाली. कुख्यात गुंड लॉरेंन्स बिश्नोईसंबंधित काहीजणांची नावे समोर आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही आरोपींना गुजरातमधील भूजच्या माता मढ येथून ताब्यात घेतले आहे.

याशिवाय आरोपी महिनाभर नवी मुंबईतील पनवेल परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होते. याच परिसरात सलमान खान याचे एक फार्महाउसही आहे. पोलिसांनी या घटनेसंबंधित सकाळच्या वेळेस नवी मुंबईतील तीन जणांची चौकशी केली होती. त्यामध्ये घरमालक, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या बाइकचा आधीचा मालक, बाइक विक्रीची सुविधा देणारा एजेंट आणि तपासासाठी अन्य काहीजणांचा समावेश होता. आता पोलिसांनी दोन आरोपींना गुजरात येथून अटक केली आहे.

किती आहे सलमानची संपत्ती?

सलमानची संपत्ती मीडिया रिपोर्टनुसार 2900 कोटी इतकी आहे. सलमान प्रत्येक ब्रँडच्या प्रोमोशनसाठी 7 - 8 कोटी रुपये घेतो. तो त्याच्या चित्रपटांतून 100 कोटींचा तरी नफा मिळवतो. सलमान खान छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चेचा असलेला 'बिग बॉस' हा शो होस्ट करतो. शो होस्ट करण्यासाठी तो प्रचंड पैसे घेतो.

आणखी वाचा :

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक, गुन्हे शाखेने असा लावला आरोपींचा छडा

खळबळ जनक! सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, ४ राउंड फायर; सलमानच्या सुरक्षेत वाढ