MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Nayanthara Remuneration : 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 5 कोटी? या साऊथ सुपरस्टारची फी ऐकून थक्क व्हाल

Nayanthara Remuneration : 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 5 कोटी? या साऊथ सुपरस्टारची फी ऐकून थक्क व्हाल

साऊथच्या अभिनेत्री आता मानधनाच्या बाबतीत बॉलिवूडलाही तगडी टक्कर देत आहेत. वयाची ४० ओलांडली तरी त्यांची क्रेझ कमी झालेली नाही. एका साऊथ सुपरस्टारने तर एका सेकंदासाठी चक्क १० लाख रुपये आकारले आहेत. कोण आहे ही अभिनेत्री?

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 13 2026, 11:38 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
साऊथमध्ये नयनताराची जबरदस्त क्रेझ
Image Credit : Asianet News

साऊथमध्ये नयनताराची जबरदस्त क्रेझ

आपण नेहमीच स्टार हिरोंच्या तगड्या मानधनाबद्दल ऐकतो. पण साऊथची 'लेडी सुपरस्टार' नयनतारा या बाबतीत कुणापेक्षाही कमी नाही. तिने एका ५० सेकंदाच्या जाहिरातीसाठी चक्क ५ कोटी रुपये फी घेतल्याची चर्चा आहे. म्हणजेच या जाहिरातीत तिने एका सेकंदासाठी १० लाख रुपये कमावले आहेत!

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
२० वर्षांचा यशस्वी सिनेप्रवास
Image Credit : Nayanthara\Instagram

२० वर्षांचा यशस्वी सिनेप्रवास

केरळच्या नयनताराने 'मनस्सिनक्करे' या मल्याळम चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'अय्या' या तमिळ चित्रपटातून तिने साऊथमध्ये आपली ओळख निर्माण केली. गेल्या २० वर्षांपासून ती तमिळ, तेलुगू आणि मल्याळम इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. वयाची ४० ओलांडली असली, लग्न झालं असलं आणि सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांची आई असली, तरी तिची मार्केट व्हॅल्यू अजिबात कमी झालेली नाही.

Related Articles

Related image1
Jailer 2 : रजनीकांत यांच्या तोंडावर धूर सोडताना विद्या बालनची उडालेली तारांबळ; दिग्दर्शकाने सांगितला किस्सा
Related image2
Kareena Kapoor : सिंगापूर F1 ग्रांप्रीमध्ये करीनाच्या 'या' बॅगची एकच चर्चा; किंमत ऐकून थक्क व्हाल
35
साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री
Image Credit : Asianet News

साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री

दक्षिण भारतात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत नयनतारा टॉपवर आहे. सध्या ती एका चित्रपटासाठी १२ ते १५ कोटी रुपये घेते. शाहरुख खानसोबतच्या 'जवान' चित्रपटाने १००० कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटामुळे तिला पॅन इंडिया लेव्हलवर मोठी ओळख मिळाली.

45
जाहिरात विश्वात नवा रेकॉर्ड
Image Credit : Asianet News

जाहिरात विश्वात नवा रेकॉर्ड

चित्रपटांसोबतच ब्रँड एंडोर्समेंटमधूनही नयनतारा कोट्यवधी रुपये कमवते. गेल्या वर्षी तिने 'टाटा प्ले' (Tata Play) या प्रसिद्ध डीटीएच ब्रँडच्या जाहिरातीसाठी ५ कोटी रुपये घेतल्याची माहिती आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी अशा चार भाषांमध्ये दोन दिवस या जाहिरातीचं शूटिंग चाललं होतं.

55
यशस्वी बिझनेसवुमन नयनतारा
Image Credit : Nayanthara

यशस्वी बिझनेसवुमन नयनतारा

अभिनयासोबतच नयनतारा एक यशस्वी बिझनेसवुमन आणि निर्मातीसुद्धा आहे. पती विघ्नेश शिवनसोबत मिळून ती 'राउडी पिक्चर्स' या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत हिट चित्रपटांची निर्मिती करते. याशिवाय तिचे स्वतःचे काही व्यवसाय असून दुबईतही तिने मोठी गुंतवणूक केली आहे. चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून तिने आपलं एक मोठं साम्राज्य उभं केलं आहे.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Jailer 2 : रजनीकांत यांच्या तोंडावर धूर सोडताना विद्या बालनची उडालेली तारांबळ; दिग्दर्शकाने सांगितला किस्सा
Recommended image2
Saif Ali Khan : करिनानंतर 6 वर्षांनी सैफची इन्स्टाग्रामवर एन्ट्री, पतौडी लायब्ररीचे फोटो व्हायरल
Recommended image3
Kareena Kapoor : सिंगापूर F1 ग्रांप्रीमध्ये करीनाच्या 'या' बॅगची एकच चर्चा; किंमत ऐकून थक्क व्हाल
Recommended image4
Hanuman Ansh Box Office : फक्त 2 कोटींचं बजेट, 'हनुमान अंश'ने 66 दिवसांत कमावले 446 कोटी
Recommended image5
Gauahar Khan : गौहर खानने विकला मुंबईतील डुप्लेक्स फ्लॅट, किती कोटींचा फायदा झाला माहितीये?
Related Stories
Recommended image1
Jailer 2 : रजनीकांत यांच्या तोंडावर धूर सोडताना विद्या बालनची उडालेली तारांबळ; दिग्दर्शकाने सांगितला किस्सा
Recommended image2
Kareena Kapoor : सिंगापूर F1 ग्रांप्रीमध्ये करीनाच्या 'या' बॅगची एकच चर्चा; किंमत ऐकून थक्क व्हाल
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved