Navri Mile HitlerLa : लीलाकडे काय मागणार एजे ? मालिकेतील नवीन ट्विस्ट पाहायला विसरू नका

| Published : Apr 10 2024, 04:46 PM IST

Navari mile hitlerla marathi serial

सार

विक्रांत विरोधात तिला मदत करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे अभिराम होता. वचन दिल्या प्रमाणे एजेने लीलाची मदत केली आहे. मात्र लीलाने देखील मदत मागताना वाचन दिलं होत ते आता लीला पूर्ण करणार का ? जाणून घ्या आजच्या एपिसोडमध्ये. 

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात एजे त्यांनी दिलेले वचन पूर्ण करणार आहे.लीलाची बहीण रेवतीला विक्रांत खोट्या प्रेमात फसवत असून तिला त्याच्यापासून धोका असल्याने लीला एजेकडे मदत मागते.त्यामुळे लीलाला दिलेले वचन त्यांनी पूर्ण करायचे ठरवले. कारण एजे असे एकमेव व्यक्ती आहेत, जे विक्रांतला धडा शिकवू शकतात. एका महिलेवर अन्याय होतोय, तिला फसवलं जातय, हे कळल्यानंतर एजेंनीदेखील लीलाला मदत करण्याचं वचन दिलं. आता एजे म्हणजे दिलेला शब्द पाळणारा माणूस अशीच त्यांची ओळख... मात्र, या बदल्यात त्यांनी लीलाकडून देखील एक वचन मागितलं होतं.

वेळ आल्यानंतर मी तुझ्याकडे जे मागेन, ते तुला द्यावं लागेल अर्थात तुला ते करावं लागेल, असं त्यांनी लीलाला म्हटलं होतं. तर, माझ्या बहिणीसाठी मी जीव देखील देऊ शकते, असं लीलाने म्हटलं होतं. आता एजेंनी लीलाला दिलेले वचन पूर्ण केल्यानंतर, लीलाला देखील तिच्या वचनाची पूर्ती करावी लागणार आहे. मात्र, आता एजे म्हणजेच अभिराम जहागीरदार लीलाकडे अशी एक गोष्ट मागणार आहेत, जे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसणार आहे. विक्रांत हा एजेंच्या सुनेचा भाऊ आहे, हे नुकतेच समोर आले आहे. आता विक्रांत सांगूनही ऐकत नाही म्हटल्यावर एजेंनी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता.

विक्रांतचे कारनामे उघड होणार :

आपण दिल्लीला जातोय असं सांगून, त्यांनी विक्रांतला घरी बोलावलं होतं. मात्र, एजे कुठेही न जाता घरीच थांबलेले होते. त्यांना अचानक समोर पाहून विक्रांतची भंबेरी उडाली होती. एजेंनी आपल्या बायकोसमोर आपले बिंग फोडू नये, यासाठी तो त्यांना धमकवायचा प्रयत्न करत होता. मात्र, विक्रांतचे बॉस म्हणजेच एसीपी सर हे एजेंच्याच घरात उपस्थित होते. विक्रमचे सगळे कारनामे ऐकताच त्यांनी विक्रांतला तत्काळ निलंबित केले. त्यामुळे आता विक्रांतला त्याच्या वर्दीचा वापर करता येणार नाहीये. तर, ‘पुढच्या अर्ध्या तासात जाऊन तू रेवतीला सगळ्या खऱ्या गोष्टी सांगशील, नाहीतर मी तुला समाजात तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवणार नाही’, अशी धमकी एजेंनी विक्रांतला दिली आहे.

आणखी वाचा :

अभिनेता अंबर गणपुले व शिवानी सोनार दोघांनी उरकला गुपचूप साखरपुडा

मुलीचा आंनद पाहून आईला अश्रू अनावर ! सई ताम्हणकरने खरेदी केली आलिशान मर्सिडीज कार

Bigg Boss OTT 3: लवकरच 'बिग बॉस ओटीटी ३' प्रेक्षकांच्या भेटीला; कधीपासून सुरू होतोय शो? वाचा