'सेलिब्रेटी बाप्पा', पाहा मराठी कलाकरांच्या गणपतीचे खास PHOTOS
- FB
- TW
- Linkdin
मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकरचा गणपती
मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या घरी दरवर्षी गणपतीची स्थापना केली जाते. यंदाही गणेशोत्सवावेळी सिद्धार्थ आणि मितालीच्या घरी बाप्पा विराजमान झाले. यावेळी गणपतीसाठी सुंदर फुलांची आरास करण्यात आली होती.
मिथिला पालकरकडून गणपतीची पूजा
मिथिला पालकरने गणपतीचे काही फोटो सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी मिथिलाने गुलाबी रंगातील साडी नेसली होती.
प्रार्थना बेहरेचा बाप्पा
मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. अभिनेत्रीने यंदाच्या गणपतीचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सोनाली कुलकर्णीचा बाप्पा
सोनाली कुलकर्णीचे बाप्पाची पूजा करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेरी अभिनेत्रीने मराठमोठा लूक केल्याचे दिसून आले.
प्रसाद जावडे आणि अमृता देशमुखच्या घरचा गणपती
अभिनेता प्रसाद जावडे आणि अभिनेत्री अमृता देखमुख यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले. या दोघांनी गणपतीसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अभिज्ञा भावेचा बाप्पा
मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरी यंदा बालाजीच्या रुपातील गणपती बाप्पा विराजमान झाले. अभिनेत्रीने गणपतीची सुंदर अशी आरास केल्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
आणखी वाचा :
गणपतीच्या पूजेवरुन आमिर खान ट्रोल, युजर्स म्हणाले 'हिंदू होण्याचा...'