- Home
- Entertainment
- Malaika Arora Fashion : मलायका अरोराचा साडीतील ग्लॅमरस लूक, साडीची किंमत ऐकून थक्क व्हाल
Malaika Arora Fashion : मलायका अरोराचा साडीतील ग्लॅमरस लूक, साडीची किंमत ऐकून थक्क व्हाल
मलायका अरोरा नेहमीच तिच्या फॅशनसाठी चर्चेत असते. सहसा वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसणारी मलायका यावेळी पारंपारिक साडीतही खूप ग्लॅमरस दिसत आहे. एम्ब्रॉयडरी ब्लाउज, स्टेटमेंट बेल्ट आणि दागिन्यांसह तिचा रॉयल लूक लक्ष वेधून घेत आहे.

साडीतही मलायकाचा ग्लॅमरस अंदाज
फॅशनच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच स्पेशल असते. प्रसंग कोणताही असो, ती तिच्या स्टाईलने सर्वांची नजर वेधून घेते. बहुतांश वेळा वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसणारी ही अभिनेत्री यावेळी पारंपारिक साडीत दिसली. मात्र, तिने निवडलेला लूक खूपच वेगळा आहे. मेटॅलिक शाईन असलेल्या साडीला तिने रॉयल टच दिला आहे.

मेटॅलिक साडीत रॉयल लूक
मलायकाने या लूकसाठी शॅम्पेन ब्रॉन्झ कलरची मेटॅलिक साडी निवडली आहे. साडीवरील चमक आणि काठावरची सुंदर एम्ब्रॉयडरी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या स्टाईलमध्ये तिने पदर खांद्यावर घेतला आहे, ज्यामुळे तिच्या लूकमध्ये अधिक रॉयल टच आला आहे.
या साडीसोबत तिने हेवी एम्ब्रॉयडरी असलेला ब्लाउज घातला आहे. सोनेरी आणि हिरव्या रंगाच्या डिझाईन्समुळे ब्लाउज खूपच सुंदर दिसत आहे. कमरपट्टा किंवा स्टेटमेंट बेल्ट हे या लूकचे मोठे वैशिष्ट्य आहे. रंगीबेरंगी खडे, मोती आणि पारंपारिक डिझाईन असलेल्या या बेल्टने साडीच्या लूकला चार चाँद लावले आहेत.
साडीची किंमत ऐकून आश्चर्य वाटेल
मलायकाने नेसलेली ही सुंदर साडी प्रसिद्ध डिझायनर लेबल 'Itrh' च्या कलेक्शनमधील आहे. या सहावारी मेटॅलिक साडीची किंमत तब्बल २,२०,००० रुपये आहे. म्हणजेच फक्त साडीसाठीच तिने २.२ लाख रुपये खर्च केले आहेत.
दागिने आणि मेकअपची खास निवड
साडीला साजेसे असे दागिने मलायकाने निवडले आहेत. खड्यांचा चोकर नेकलेस, त्याला मॅचिंग इअररिंग्स, पारंपारिक मांगटिका आणि बांगड्या तिने घातल्या आहेत. केस छान मागे बांधून अंबाडा केल्यामुळे दागिने आणि ब्लाउजची डिझाईन अधिक उठून दिसत आहे.
मेकअपच्या बाबतीतही मलायकाने खूप नजाकत दाखवली आहे. डोळ्यांचा आकर्षक मेकअप, ग्लोईंग त्वचा आणि पिंक लिपस्टिकमुळे ती खूपच गॉर्जियस दिसत होती. साडीच्या गोल्डन टोनला साजेसा मेकअप केल्यामुळे तिचा लूक क्लासिक वाटत होता.

