GIVA च्या रक्षाबंधन जाहिरातीवरून झालेल्या वादानंतर क्रिती सेनॉन पुन्हा चर्चेत आली आहे. या जाहिरातीत तिच्या कपड्यांवरून टीका झाल्यानंतर कंपनीने जाहिरात मागे घेतली. याच दरम्यान, तिच्या कोटींच्या संपत्तीची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई : क्रिती सेननचा आर्थिक प्रवास पाहिला, तर बॉलिवूडमधील करिअर कसं एका मोठ्या व्यावसायिक साम्राज्यात बदलू शकतं, हे स्पष्ट दिसतं. एका अंदाजानुसार, क्रितीची एकूण संपत्ती सुमारे 82 कोटी रुपये आहे. तिची ही कमाई चित्रपट, ब्रँड जाहिराती, डिजिटल कोलॅबोरेशन आणि तिच्या स्वतःच्या व्यवसायातून येते.
रिपोर्ट्सनुसार, क्रिती एका चित्रपटासाठी साधारणपणे 4 ते 6 कोटी रुपये मानधन घेते. तिच्या लोकप्रियतेमुळे ती अनेक मोठ्या ब्रँड्सचा चेहरा बनली आहे. तिने आतापर्यंत फॉसिल, टायटन, बाटा, व्हर्लपूल आणि अमूल यांसारख्या ब्रँड्ससाठी जाहिराती केल्या आहेत. प्रत्येक जाहिरातीसाठी ती जवळपास 1 कोटी रुपये घेते असं म्हटलं जातं.
अभिनय आणि जाहिरातींपलीकडे, क्रितीने एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिने 'Ms. Taken' हा फॅशन ब्रँड, 'The Tribe' हे फिटनेस प्लॅटफॉर्म, 'Hyphen' हा ब्यूटी ब्रँड आणि 'ब्लू बटरफ्लाय फिल्म्स' हे प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. विशेषतः, तिचा 'Hyphen' हा स्किनकेअर ब्रँड खूप यशस्वी ठरला आहे. 'द इकॉनॉमिक टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, या कंपनीने पहिल्याच वर्षात 100 कोटींहून अधिक महसूल मिळवला होता.
क्रिती सेनॉनची लक्झरी लाइफस्टाइल
तिची ही संपत्ती तिच्या लक्झरी लाइफस्टाइलमधून दिसून येते. क्रिती मुंबईतील अंधेरी भागात एका लक्झरी डुप्लेक्समध्ये राहते, ज्यासाठी ती दरमहा सुमारे 10 लाख रुपये भाडं देते. ही मालमत्ता अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं. याशिवाय, तिने जुहू आणि अलिबागमध्येही मालमत्तांमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती आहे.
लक्झरी कार कलेक्शन
तिच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी क्यू7, मर्सिडीज-मेबॅक जीएलएस 600 आणि बीएमडब्ल्यू 3 सिरीज यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांची एकूण किंमत सुमारे 3 ते 4 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
GIVA चा वाद काय?
GIVA वादाच्या पार्श्वभूमीवर क्रितीच्या ब्रँड असोसिएशन्सची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. GIVA या ज्वेलरी ब्रँडने रक्षाबंधननिमित्त एक जाहिरात प्रसिद्ध केली होती, ज्यात क्रिती होती. मात्र, या जाहिरातीत सणाची मांडणी आणि क्रितीच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर टीका झाली. या वादानंतर कंपनीने ही जाहिरात मागे घेतली. जाहिरात मागे घेण्यापूर्वी क्रितीने या टीकेला उत्तरही दिलं होतं.
या वादामुळे क्रितीच्या करिअरचा आणखी एक पैलू समोर आला आहे. तो म्हणजे, बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध सेलिब्रिटी ब्रँड अँबेसेडर म्हणून तिच्यावर असलेली मोठी व्यावसायिक जबाबदारी आणि तिचा प्रभाव.


