Kangana Ranaut Parliament Look : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कंगना रणौत पुन्हा एकदा तिच्या लक्झरी लूकमुळे चर्चेत आली आहे. तिने घातलेलं महागडं रोलेक्स घड्याळ आणि हर्मिस बर्किन बॅगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या या लूकची किंमत ऐकून तुम्हीही चकित व्हाल.

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते, पण जेव्हा विषय फॅशनचा येतो, तेव्हा तिचा हात कोणी धरू शकत नाही. सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कंगना एकापेक्षा एक जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. सुंदर साड्यांपासून ते मोत्यांच्या दागिन्यांपर्यंत, तिची स्टाईल नेहमीच हटके असते.

कंगनाचा आयकॉनिक पार्लमेंट लूक

नुकताच तिचा एक लूक समोर आला आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या लूकची एकूण किंमत कळली तर धक्काच बसेल. कंगनाने फिक्या आकाशी रंगाची सुंदर साडी आणि त्यावर पांढरा ब्लाऊज घातला होता. या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने स्टायलिश हर्मिस बर्किन बॅग आणि एक महागडं रोलेक्स घड्याळ वापरलं होतं. कंगनाने वापरलेल्या 'हर्मिस ब्लॅक बर्किन टोगो लेदर' बॅगची किंमत तब्बल ३५ लाख रुपये आहे. तर तिच्या 'रोलेक्स लेडी डेटजस्ट चॉकलेट ब्राउन डायल' घड्याळाची किंमत २१ लाख रुपये आहे. म्हणजेच, तिच्या या लूकची एकूण किंमत ५६ लाख रुपये आहे.

View post on Instagram

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

कंगनाचा हा लूक व्हायरल होताच चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एकाने लिहिले, "तिने कष्टाने कमावलेले पैसे आहेत... तिला ते दाखवण्याचा पूर्ण अधिकार आहे." तर 'नुपी इंडिया' नावाच्या ब्रँडने लिहिले, "तिने घातलेली ही साडी मणिपुरी मोटीफमध्ये डिझाइन केलेली एरी सिल्क साडी आहे. ही ईशान्य भारतातील 'नुपी' या ब्रँडची आहे. ब्रँडबद्दल अधिक माहितीसाठी आमचे पेज nupi_india आणि वेबसाइट www.nupi.in पहा." आणखी एकाने लिहिले, "कष्टाने कमावलेले पैसे आहेत. ती याला पात्र आहे."

वर्क फ्रंटवर काय?

कंगना नुकतीच २६/११ च्या हॉस्पिटल-सर्व्हायव्हल ड्रामा 'भारत भाग्य विधाता' मध्ये दिसली होती. आता तिचे 'क्वीन २' आणि 'सर्कल' हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.