Dilip Joshi Taarak Mehta Jethalal : तारक मेहता मालिकेतून आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचले दिलीप जोशी अर्थात जेठालाल यांनी सलमान खानसोबत काम केलं आहे.
मुंबई : आज टीव्हीवरील लोकप्रिय असलेला कलाकार एकेकाळी त्याची कमाई ५० रुपये होती. सलमान खानच्या सिनेमात या कलाकाराने नोकराची भूमिका साकारली होती. त्यासाठी त्याला ५० रुपये मानधन देण्यात आलं होतं. पण मागील जवळपास १६ वर्षांपासून हाच कलाकार टीव्ही मालिका गाजवतो आहे. आज तो दिवसाला दीड लाख इतकी कमाई करतो आहे. मागील १६ वर्षांपासून हा अभिनेता लहान, मोठ्यांसह सर्वांचच आपल्या अभिनयाने मनोरंजन करतो आहे.
हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून आहे दिलीप जोशी, अर्थात सर्वांचा आवडता जेठालाल. तारक मेहता का उल्टा चष्मा या टीव्ही मालिकेतून दिलीप जोशी अर्थात जेठालाल घराघरात पोहोचला. त्याचं जेठालाल पात्र लहान, मोठे सर्वांनाच आपल्या जवळचं वाटतं. जेठालालला तारक मेहता मालिकेतून अतिशय लोकप्रिय झाला. महत्त्वाची बाब म्हणजे इतके वर्ष मालिका चालू असून त्यांच्या जेठालाल या पात्राला आजही तितकंच भरभरुन प्रेम मिळतं आहे.
आज टीव्ही मालिकेतून लोकप्रिय झालेला जेठालाल, दिलीप जोशी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात १९८९ मध्ये सलमान खानच्या 'मैने प्यार किया' या सिनेमातून केली होती. सिनेमात त्यांनी सलमानच्या नोकराची लहानशी भूमिका साकारली होती. याच भूमिकेसाठी त्यांना ५० रुपये मिळाले होते. तेव्हा कोणालाही वाटलं नसेल, की हा कलाकार पुढे इतकी मोठी प्रसिद्धी, पैसा, फेम कमवेल.
सिनेमात कामाची सुरुवात तर झाली, पण अपेक्षित काम न मिळाल्यामुळे दिलीप जोशी यांनी काही काळ अभिनयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अभिनय सोडून त्यांनी एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. काही वर्ष ते या एजन्सीमध्ये काम करत होते. त्यानंतर, २००८ मध्ये त्यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला. २००८ मध्ये त्यांना त्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत 'जेठालाल'ची भूमिका मिळाली आणि आज ते घराघरातील आवडता चेहरा ठरले आहेत.
मालिका सुरू होऊन जवळपास १७ वर्षांहून अधिक काळ लोटला तरी जेठालालसाठी प्रेक्षकांचं प्रेम जराही कमी झालेलं नाही. अभिनय, संवाद, कॉमिक टायमिंग या सगळ्याच गोष्टी ते सहज पण अत्यंत प्रभावीपणे पार पाडतात. एकेकाळी ५० रुपये कमावलेला हा अभिनेता आज सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. ते एका एपिसोडसाठी १.५० लाख घेतात अशी माहिती आहे. आज जेठालाल अर्थात दिलीप जोशी टेलिव्हिजन क्षेत्रातील आवडता, लोकप्रिय अभिनेता ठरले आहेत.


