फराह खानने नुकताच श्रीमंत सेलिब्रिटींच्या घरच्या पाहुणचारावर भाष्य केलंय. बॉलिवूडमधील बदलती जीवनशैली, कलाकारांचा लवाजमा आणि महागड्या जेवणाबाबत तिने केलेला हा खुलासा सध्या चर्चेत आहे.

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. फराह तिच्या यूट्यूब व्लॉगसाठी अनेक श्रीमंत सेलिब्रिटींच्या घरी जात असते. तिथे आलेले अनुभव तिने नुकतेच शेअर केलेत. बॉलिवूडची संस्कृती गेल्या काही वर्षांत कशी बदललीये, यावर तिने सविस्तर भाष्य केलंय.

Viral Video: जपान एअरलाइन्सच्या विमानाला रनवेवर भीषण आग! अंगावर काटा आणणारा व्हिडिओ (WATCH)

View post on Instagram
 

Viral Video: चालत्या ट्रेनच्या टॉयलेटमधून उडतायत आगीच्या ठिणग्या! प्रवाशांची उडाली झोप (WATCH)

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यासोबत बोलताना फराहने सेटवरच्या बदलत्या वातावरणाकडे लक्ष वेधलं होतं. आजकाल कलाकारांसोबत त्यांच्या स्टाफचा मोठा लवाजमा असतो. शिवाय प्रायव्हेट शेफ, व्हॅनिटी व्हॅन आणि इतर लक्झरी गोष्टी सेटवर वाढल्याचं ती म्हणाली. पूर्वीच्या काळी सेटवर मोजकीच लोकं असायची आणि सगळे एकत्र बसून जेवायचे, अशी आठवण तिने सांगितली. आजकाल काही कलाकार स्वतःच्या शेफकडून महागडं जेवण बनवून घेतात, पण आपण मात्र आजही घरूनच डबा आणतो, असं फराहने आवर्जून सांगितलं.

फराहच्या यूट्यूब सीरिजमधून अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या घरांची आणि त्यांच्या लाइफस्टाईलची झलक पाहायला मिळते. क्रिस्टल डिसूझा, अंजली आनंद आणि ओरी (Orry) यांसारखे सेलिब्रिटी तिच्या व्लॉगमध्ये दिसले आहेत. पण, पाहुणचाराबाबत बोलताना तिने नेमक्या कोणत्या श्रीमंत व्यक्तीचा उल्लेख केलाय, हे मात्र गुलदस्त्यात ठेवलंय. त्यामुळे सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या सेलिब्रिटींची नावं जोडत असले, तरी त्याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही. पैसा असणं आणि साधेपणाने पाहुणचार करणं, यात किती मोठा फरक आहे, हाच फराहच्या बोलण्याचा मुख्य मुद्दा होता.