ज्येष्ठ दिग्दर्शक आणि संपादक व्ही.एन. मयेकर यांचे ८५ व्या वर्षी निधन झाले. 'सिंहासन', 'उंबरठा' सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक आणि संपादक व्ही.एन. मयेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मयेकर यांनी दर्जेदार मराठी चित्रपट बनवले 

व्ही.एन. मयेकर हे केवळ दिग्दर्शकच नव्हते, तर ते एक एडिटर आणि फिल्म मेकर म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीत महत्वाचा वाटा उचलला होता. 'सिंहासन', 'उंबरठा', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', 'गांधी' अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी एडिटर म्हणून काम केलं होत.

सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली 

त्यांच्या निधनामुळे अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेसृष्टीतील व्यक्तींनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि समीक्षकांनी त्यांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. "एक उत्तम एडिटर आणि शांत, संयमी व्यक्तिमत्व हरपलं" अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

मयेकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार पटकावले होते. त्यांच्या कार्यामुळे अनेक नवीन कलाकारांना आणि तंत्रज्ञांना शिकण्याची संधी मिळाली. त्यांचे मार्गदर्शन अनेकांना प्रेरणादायी ठरले. त्यांनी केवळ एडिटिंगचं नव्हे तर संपूर्ण चित्रपट निर्मितीत एक नवा दृष्टिकोन दिला. चित्रपटसृष्टीतील लोकांसोबतच प्रेक्षकांनाही त्यांच्या कामाची भुरळ पडली होती. मयेकर यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीलाही त्यांच्या कामातून योगदान दिलं. त्यांचं जाणं हे एक मोठं नुकसान आहे, असं सिनेसृष्टीतील जाणकारांनी म्हटलं आहे.