ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी ११ वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोट घेतला आहे. भरतने सोशल मीडियावर नवीन प्रेमसंबंध जाहीर केला आहे. त्यांच्या दोन मुली आहेत ज्यांची काळजी दोघेही घेत आहेत.

हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल आणि उद्योगपती भरत तख्तानी यांचे २०१२ मध्ये लग्न झालं होतं. दोघांनी जवळपास ११ वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून यामुळं फॅन्सला धक्का बसला आहे. या जोडप्याला 6 वर्षांची राध्या आणि 4 वर्षांची मिराया या दोन मुली आहेत. दोघेही मुलांची काळजी घेत असून भरत परत प्रेमात पडला असल्याचं त्यानं सांगितलं आहे.

भरत तख्तानी सोशल मीडियावर काय म्हणाला? 

भरत तख्तानी याने सोशल मीडिया हँडलवर नवीन गल्रफ्रेंडची माहिती दिली आहे. मेघना लखानी तलरेजा असं तीच नाव असून भरतने तीच आपल्या कुटुंबात स्वागत केलं आहे. तो लिहितो की, 'कुटुंबात तुझे स्वागत आहे. हे अधिकृत आहे'. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सगळीकडं खळबळ उडाली आहे. आता ईशा आणि भरतच्या जुन्या मुलाखती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. दोघांनी शाही अंदाजात लग्न केलं होतं.

दोघांनी त्या काळातील सर्वात मोठं लग्न केलं होतं. त्यानं ग्लॅमरस जीवनात पाऊल टाकल्यामुळे दोघांचे लग्न अतिशय भव्यदिव्य वातावरणात पार पडलं होतं. लग्नानंतर दोघांनाही फिल्मफेअर मासिकाला मुलाखत दिली होती. यामध्ये ईशाने एक दावा केला होता आणि त्यामुळं एकच खळबळ उडाली.

ईशा काय म्हणाली होती? 

तिने सांगितलेले की ती तिचे कुटुंब आणि काम दोघांमध्ये समतोल राखत सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. भरतने त्या मुलाखतीत ईशाचे कौतुक केले आणि सांगितलेले की लग्नानंतर तिने स्वतःमध्ये खूप बदल केले आहेत. भरतच्या मते, ईशा नेहमीच घरगुती स्वभावाची आहे, ती स्वतःला टॉमबॉय मानत असली तरीही.... त्याने असेही सांगितले की ईशाने त्याच्यासाठी स्वयंपाकघरातील काम शिकण्यास सुरुवात केली होती. तो हसत म्हणालेला.... ती अशी मुलगी होती जिला चहा कसा बनवायचा हे देखील माहित नव्हते.