Cine News : जगप्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या सिग्नेचर गोल्डन टिशू सिल्क साडीमध्ये शोभिता धुलिपाला खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेला हा 'रॉयल लूक' सोशल मीडियावर काही क्षणातच व्हायरल झाला आहे.
Cine News : दाक्षिणात्य अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिने हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांत काम केले आहे. 'पोन्नियिन सेल्वन'मुळे तिला एक ओळख मिळाली. किंग नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. सध्या ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या स्टायलिश लूकमुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या सोनेरी रंगाच्या हँडवोव्हन टिशू सिल्क साडीमध्ये शोभिता दिसली. तिचा हा 'रॉयल लूक' सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाला आहे.

सोनेरी रंगाच्या या साडीचे मऊ टेक्स्चर आणि सुंदर विणकाम हे मुख्य आकर्षण आहे. साडीच्या बॉर्डरवर केलेले जरदोसी (Zardozi) वर्क तिच्या सौंदर्यात आणखी भर घालते. साधी पण अतिशय सुंदर असलेली ही साडी कोणत्याही विशेष प्रसंगासाठी योग्य ठरेल अशा पद्धतीने डिझाइन केली आहे.

या साडीवर शोभिताने मॅचिंग राऊंड नेक ब्लाउज घातला आहे. कोपरापर्यंत लांबी असलेल्या ब्लाउजच्या बाहींवर हेवी जरदोसी एम्ब्रॉयडरी केली आहे. मनीष मल्होत्राच्या 'हाय ज्वेलरी' कलेक्शनमधील एमराल्ड-पोल्की चोकर नेकलेस तिने दागिन्यांमध्ये निवडला आहे. सोबत सिंगल रिंग आणि फ्लोरल स्टड इअररिंग्सने तिचा लूक पूर्ण केला आहे.
शोभिताने मिनिमलिस्टिक मेकअप केला आहे. डोळ्यांवर लक्ष केंद्रित करणारा आयलायनर आणि काजळाच्या स्ट्रोक्समुळे तिला क्लासिक लूक मिळाला आहे. केस साध्या बन स्टाईलमध्ये बांधल्यामुळे तिचे दागिने आणि साडी अधिक उठून दिसतात.

मणिरत्नम यांच्या चित्रपटांमधील नायिकांची आठवण करून देणारा शोभिताचा हा साडी लूक फॅशन जगतात चर्चेचा विषय बनला आहे. तिचा हा नवीन लूक तिच्या लग्नाच्या साडीशी मिळताजुळता असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.


