Bhagyashri Borse : खानदेशी मराठी मुलगी तेलुगू अभिनेत्री, गाजतेय तेलुगू चित्रपटात
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्रीला लहानपणापासूनच कॅमेऱ्यासमोर येण्याचं स्वप्न होतं. पण जेव्हा तिने 'मला अभिनेत्री व्हायचंय' असं घरी सांगितलं, तेव्हा घरात मोठं भांडण झालं. पुढे काय झालं माहितीये?
17

Image Credit : Insatgram
आईकडून सहा महिने व्हॉटसअपवर ब्लॉक
सिनेसृष्टीच्या झगमगाटामागे अनेकदा संघर्षाची कहाणी दडलेली असते. सध्या तेलुगू चित्रपट 'लेनिन'मुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत धुमाकूळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री बोरसे हिच्या आयुष्याची गोष्टही अशीच आहे. यशाच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीला तिच्या सख्ख्या आईनेच सहा महिने व्हॉट्सॲपवर ब्लॉक केलं होतं! का? चला जाणून घेऊया.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

27
Image Credit : Insatgram
छत्रपती संभाजीनगरमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी
भाग्यश्री महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तिला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. पण आपल्याकडच्या सामान्य घरांमध्ये जसं होतं, तसंच तिच्या घरीही झालं. जेव्हा तिने घरी सांगितलं की तिला अभिनेत्री व्हायचंय, तेव्हा घरात एकच वादळ उठलं.
37
Image Credit : Insatgram
आई नाही म्हटल्यावर मी तरी काय करणार
तिने आधी आईला फोन केला, पण आईने 'ते काही आपल्याला नको' असं ठणकावून सांगितलं. वडिलांना फोन केल्यावर, 'तुझ्या आईने नाही म्हटल्यावर मी काय करणार,' असं म्हणत त्यांनीही हात वर केले. मोठ्या बहिणीकडून तरी साथ मिळेल अशी आशा होती, पण तिथेही भाग्यश्रीच्या पदरी निराशाच आली.
47
Image Credit : Insatgram
आईने 6 महिने व्हॉटसअपवर ब्लॉक केलं
कोणी काहीही म्हणो, आपलं स्वप्न पूर्ण करायचंच या जिद्दीने भाग्यश्रीने ऑडिशन द्यायला सुरुवात केली. यामुळे तिची आई इतकी नाराज झाली की, तिने तब्बल सहा महिने तिच्याशी बोलणंच बंद केलं. इतकंच नाही, तर तिला व्हॉट्सॲपवर ब्लॉक करून टाकलं! 'आज मी हे हसून सांगत असले तरी, आईने ब्लॉक केल्यावर मला झालेला त्रास खूप मोठा होता,' असं भाग्यश्रीने नुकतंच एका कॉलेजमधील कार्यक्रमात सांगितलं.
57
Image Credit : Insatgram
लहानपणी 200 रुपयांची चप्पलही घेण्याची परिस्थिती नव्हती
भाग्यश्रीच्या या जिद्दीमागे एक मोठी प्रेरणा आहे. लहानपणी एकदा वडिलांसोबत बाजारात गेली असताना तिला २०० रुपयांची एक साधी चप्पल आवडली होती. पण वडिलांनी ती घेऊन दिली नाही. 'फक्त २०० रुपयांची चप्पलही आपल्याला मिळत नाहीये,' या विचाराने तिला खूप वाईट वाटलं. त्याच दिवशी तिने ठरवलं की आयुष्यात पैशांसाठी कोणासमोर हात पसरायचे नाहीत. याच जिद्दीने आज तिला कोट्यवधी रुपये कमावणारी स्टार बनवलं आहे.
67
Image Credit : Insatgram
तुमच्या पैशात एक चप्पल विकत घेतली तरी आनंद वेगळाच असतो
आज एक यशस्वी अभिनेत्री म्हणून भाग्यश्री तरुणींना एक महत्त्वाचा सल्ला देते. ती म्हणते, 'प्रत्येक मुलीचं स्वतःचं एक बँक अकाऊंट आणि एक स्वतःचं घर असायलाच हवं. तुम्ही तुमच्या पैशांनी एक छोटीशी चप्पल जरी विकत घेतली, तरी त्यात मिळणारा आनंद खूप वेगळा असतो.'
77
Image Credit : Insatgram
आईने ब्ल़ॉक केलं, पण प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली
भाग्यश्री म्हणते, 'आयुष्यात कोणत्याही गोष्टीबद्दल पश्चात्ताप करू नका, फक्त तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.' तिची ही संघर्षगाथा ऐकून चाहते तिचं कौतुक करत आहेत. तेव्हा आईने तिला ब्लॉक केलं असेल, पण आज संपूर्ण जग तिला 'अनब्लॉक' करून तिच्यावर प्रेम करतंय!
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

