एका ताज्या मुलाखतीत लारिसा बोनेसीने तिचा कथित बॉयफ्रेंड आर्यन खान, त्याचे कुटुंब आणि स्वतः शाहरुख खानसोबतच्या तिच्या बाँडिंगवर मोकळेपणाने चर्चा केली आहे. अधिक माहितीसाठी पुढे वाचा.

मुंबई : ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री लारिसा बोनेसी १६ वर्षांपूर्वी भारतात आली होती. गेल्या काही वर्षांपासून तिचे नाव आर्यन खानसोबत जोडले जात आहे. या कथित कपलला मुंबईत बऱ्याचदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. मात्र, दोघांनीही कधीच त्यांच्या रिलेशनशिपबद्दल मीडियासमोर जाहीरपणे काहीही सांगितलं नव्हतं. पण आता एका ताज्या मुलाखतीत लारिसाने आर्यन, खान कुटुंब आणि शाहरुख खानसोबतच्या तिच्या नात्यावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

शाहरुख खानबद्दल लारिसा काय म्हणाली?

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ती म्हणाली, "तो किंग आहे. तो एक लेजेंड आहे आणि तो कायम नंबर वनच राहील. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे." ती पुढे म्हणाली, "खान कुटुंब अगदी माझ्या कुटुंबासारखंच आहे."

आर्यन खानसोबतच्या बाँडिंगवर खुलासा

लारिसाने आर्यन खान आणि त्याच्या कामाबद्दलही भरभरून कौतुक केलं. ती म्हणाली, "आर्यन एक उत्तम माणूस आहे. तो अतिशय हुशार आणि जिद्दी आहे. कधीकधी लोक म्हणतात की, 'त्याच्याकडे सर्व काही आहे.' पण तो अशा गोष्टींची पर्वा करत नाही. त्याला जे हवंय त्यासाठी तो झगडतोय. त्याच्या भविष्यासाठी आणि त्याच्या तत्त्वांसाठी तो खूप मेहनत घेत आहे. तो एक अत्यंत निश्चय असलेला मुलगा असल्याने त्याला नक्कीच यश मिळेल."

तिने असाही खुलासा केला की, तिने आर्यन दिग्दर्शित करत असलेल्या 'The Ba***ds Of Bollywood' च्या सेटला भेट दिली होती. "मी एकदा सेटवर गेले होते. त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करायला मला नक्कीच आवडेल. तो त्याच्या कामात इतका परफेक्ट आहे की, प्रत्येकालाच त्याच्यासोबत काम करायला आवडेल," असंही ती म्हणाली.