- Home
- Entertainment
- Anant-Radhika Wedding : गृह शांति पूजेला अंबानी आणि मर्चेंटच्या परिवाराची उपस्थिती, पाहा PHOTOS
Anant-Radhika Wedding : गृह शांति पूजेला अंबानी आणि मर्चेंटच्या परिवाराची उपस्थिती, पाहा PHOTOS
- FB
- TW
- Linkdin
अनंत अंबानी आणि राधिकाची गृह शांति पूजा
गायिका निकिता वाघेलाने 7 आणि 8 जुलैचे अनंत आणि राधिका मर्चेंटच्या गृह शांति पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोखाली कॅप्शन देत लिहिले की, या शानदार लग्नाच्या फंक्शनमध्ये परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली.
निकिता वाघेलाची इंस्टाग्रामवरील पोस्ट
निकिता वाघेलाने फोटोखाली लिहिले की, "गुरु ग्रुपा ही केवलम। सिंगर स्वप्निल मिस्री आणि टीमसोबत राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानीच्या गृह शांति इवेंटमध्ये परफॉर्म केले. याशिवाय कॅप्शनपुढे काही स्पेशल इमोजीही शेअर केले आहेत.
अनंत आणि राधिकाची मंडप मुहूर्त पूजा
अनंत अंबानी आणि राधिकाची मंडप मुहूर्त पूजा रविवारी (08 जुलै) पार पडणार आहे. या पूजेला राधिकाने क्रिम आणि गोल्डन रंगातील साडी नेसली होती. याशिवाय सुंदर ज्वेलरीही घातली होती.
अनंत अंबानीचा लूक
अनंत अंबानीने लाल रंगातील कुर्ता आणि गोल्डन जॅकेट घातले होते.
विशाल मिश्राचीही पूजेला उपस्थिती
अनंत आणि राधिकाने इवेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांसोबतही फोटो काढले. फोटोमध्ये अॅनिमल सिनेमातील प्रसिद्ध गाणे 'पहले भी मैं' चा गायक विशाल मिश्राही दिसून आला.
मामेरू ते संगीत सेरेमनी
3 जूनला अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटची मामेरू सेरेमनी पार पडली. 5 जूनला संगीत सेरेमनी झाली. या सोहळ्याला बॉलिवूड ते राजकीय क्षेत्रातील मंडळींनी उपस्थिती लावली होती. याशिवाय संगीत सेरेमनीवेळी आंतरराष्ट्रीय गायक जस्टिन बीबरनेही परफॉर्म केले होते.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट विवाहसोहळा
अनंत आणि राधिका मर्चेंटचा विवाहसोहळा येत्या 12 जुलैला मुंबईत होणार आहे. यानंतर 13 जुलैला शुभ आशीर्वाद, 14 जुलैला वेडिंग रिसेप्शन पार पडणार आहे.
आणखी वाचा :