Amitabh Bachchan Loan Story : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये भले आज अमिताभ बच्चन यांना खूप मान दिला जातो. पण एक काळ असाही होता जेव्हा अमिताभ बच्चन दिवाळखोर झाले होते. त्यांच्याकडे ड्रायव्हरला देण्यासाठी पैसे देखील नव्हते. हाच खास किस्सा सविस्तर वाचा...

Amitabh Bachchan Loan Story : अमिताभ बच्चन यांना बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बिग बी या नावाने ओखळले जाते. पण हे नाव कमावण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली. आज इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन यांचे मोठे नाव आहे. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक दिग्गज दिग्दर्शक वाट पाहतात. पण एक काळ असाही होता जेव्हा त्यांच्याकडे कोणताही प्रोजेक्ट नव्हता. अमिताभ बच्चन दिवाळखोर झाले होते. त्यांच्यावर ऐवढे कर्ज झाले होते की, घराबाहेर उभे राहून लोक त्यांना शिवीगाळ करायचे. याबद्दल अमिताभ बच्चन यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितले आहे. याशिवाय दिवाळखोरीच्या परिस्थिीमुळे त्यांचे प्रतीक्षा बंगला देखील विकला जाण्याची शक्यता दाट झाली होती. जाणून घेऊया अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील हा खास किस्सा सविस्तर...

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

अमिताभ बच्चन यांनी आपल्या करियरच्या सुरुवातीला अनेक हिट सिनेने दिले. करियरमध्ये सातत्याने यश मिळत असल्याच्या कारणास्तव अमिताभ यांनी एक कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 'अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड' ची स्थापना केली. पण ही कंपनी मार्केटमध्ये दीर्घकाळ टिकू शकली नाही आणि खूप मोठे नुकसान झाले. अशी स्थिती अमिताभ यांच्यावर ओढावली होती की, ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले होते.

ड्रायव्हरला देण्यासाठी पैसे नव्हते

अमिताभ बच्चन यांना कंपनीमुळे झालेल्या नुकसानीच्या कारणास्तव त्यांना त्यांच्या ड्रायव्हरला देण्यासाठी देखील पुरेसे पैसे नव्हते. एक दिवस असेच मंकी कॅप घालून यश चोप्रा यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे अमिताभ यांनी काम मागितले. यश चोप्रा यांनी अमिताभ यांच्या कामावर फक्त विश्वास ठेवत त्यांना एक चेक स्वाक्षरी करून दिला. पण अमिताभ बच्चन यांनी तो चेक घेण्यास नकार दिला. त्यांनी म्हटले की, ज्यावेळी काम देऊ कराल तेव्हाच मी हा चेक स्विकारू शकतो.

दररोज 18 तास काम

यश चोप्रा यांना अमिताभ बच्चन यांनी म्हटलेले शब्द पटले. यानंतर अमिताभ यांना चोप्रा यांनी 'मोहब्बते' सिनेमासाठी निवडले. दरम्यान, तरीही अमिताभ बच्चन यांच्यावर कर्जाचा बोझा होताच. पण अमिताभ बच्चन यांनी खचून न जाता प्रत्येक प्रकारच्या जाहिरातींमध्ये काम केले. येथून पुन्हा अमिताभ बच्चन यांच्या करियर आणि आयुष्याला कलाटणी मिळाली. दरम्यान, तीन वर्ष आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्या होत्या तरीही अमिताभ यांनी 18 तास काम करुन आपले सर्व कर्ज हळूहळू पूर्णपणे फेडले.

अपकमिंग प्रोजेक्ट्स

अमिताभ बच्चन 2026 मध्ये काही मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करताना दिसून येणार आहेत. यामध्ये खासकरुन कल्कि 2898 AD चा दुसरा भाग, ब्रह्मास्र पार्ट -2 आणि थ्रीलर सिनेमा आँखे- 2 मध्ये झळकणार आहेत. याशिवाय सेक्शन 84 आणि द इंटर्न (रीमेक) मध्येही काम करत आहेत.