रुपाली सय्यद यांच्या 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या चित्रपटाविरोधात २५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. 

महाराष्ट्रात रुपाली सय्यद या कायमच काही न काही कारणानं चर्चेत येत असतात. महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स या चित्रपटावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी २५ कोटी रुपयांचा दावा दाखल केला. हा चित्रपट कोणत्याही यक्तीरेखेवर आधारित नाही. महिलांना फसवून त्यांचं आयुष्य उध्वस्त करणाऱ्या भोंदूगिरीविरोधात जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं दीपाली यांनी म्हटलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

नेमकं काय आहे प्रकरण? 

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात या प्रकरणामुळं संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला होता. सध्या अशोक खरात प्रकरणावर आधारित महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स या सिनेमाची प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटात नेमकं काय येणार याकडं प्रेक्षकांचं लक्ष लागून राहील आहे. यावेळी रुपाली चाकणकर यांची चर्चा रंगली आहे.

२५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला 

रुपाली चाकणकर यांनी यावेळी यावेळी कायदेशीर मार्गाची निवड केली आहे. चाकणकर यांनी सय्यद यांच्यावर २५ कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावेळी सय्यद यांनी बोलताना तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला ते का झोंबतंय असा प्रश्न विचारला आहे. महिलांवर होणारे अत्याचार थांबायला हवेत. एक कलाकार म्हणून सत्य परिस्थिती समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं होत.