श्रुती मराठे: अभिनेत्री श्रुती मराठेला 'राधा ही बावरी' या मालिकेने प्रसिद्धी मिळवून दिली, पण त्यानंतर तिच्या दाक्षिणात्य चित्रपटातील एका बिकिनी फोटोमुळे ती प्रचंड ट्रोल झाली.
अभिनेत्री श्रुती मराठेचा स्वतःचा असा एक फॅन बेस आहे, तिने अभिनयाची सुरुवात बालवयापासून केली होती. तिने तिच्या करिअरची सुरुवात दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून केली आणि आज स्वतःची अशी ओळख तयार केली. तिला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये अवघडल्यासारखं होत असल्यामुळं ती मराठी चित्रपटसृष्टीत आली आणि आपल्या करिअरला सुरुवात केली.
राधा ही बावरी या मालिकेने दिली प्रसिद्धी
मिळवून अभिनेत्री श्रुती मराठेला राधा ही बावरी या मालिकेने प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेमुळे ती घराघरात जाऊन पोहचली. महाराष्ट्रातील गावखेड्यामध्ये तिच्या या मालिकेला आवडीने पाहिलं जात होतं. ज्यावेळी श्रुती ही प्रसिद्ध होत होती, त्यावेळी तिचा बिकीनीमधील एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यावरून ती प्रचंड ट्रोल झाली होती.
श्रुतीने मुलाखतीत केले धक्कादायक खुलासे
श्रुतीने एका मीडिया हाऊसला मुलाखत दिली, त्यामध्ये तिने धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामध्ये बोलताना श्रुती बोलते की, २०१२ मध्ये माझी राधा ही बावरी मालिका आली होती, त्यामध्ये मला घराघरात प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर माझे साऊथमधील एका चित्रपटातील बिकिनी घातलेले फोटो व्हायरल झाले आणि सगळीकडून ट्रोल व्हायला सुरुवात झाली.
मी करिअरची सुरुवात साऊथ इंडस्ट्रीमधून केली होती. त्या इंडस्ट्रीमध्ये कधी काय आणि कोठे होत ते मला माहित नव्हते. पण आजसुद्धा मी त्यावेळी बिकीनीचा सीन केलाय याबद्दल मला काही वाटत नाही. त्यावेळी मी तो सीन केला याबद्दल मला कधी काही वाटलं नाही. पण लोकांनी माझं नाव सर्च करायला सुरुवात केल्यानंतर त्यांना त्याबद्दल माहिती झाली.


