मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने केलेल्या फोटोशूटमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. तिच्या बॅकलेस टॉप आणि पँटमधील फोटोंवरून नेटकऱ्यांनी टीका केली आहे. काहींनी तिच्या ड्रेसिंग सेन्सवर आक्षेप घेतला असून काहींनी तिचे समर्थन केले आहे.

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हि कायमच चर्चेत राहत असते. ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते आणि नंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टवर ट्रोलिंग करण्यात आली असून प्रेक्षकांनी कमेंट करून ट्रॉल केलं आहे. बॅकलेस टॉप आणि पँटवर तिने फोटोशूट केलं आहे

इंस्टाग्रामवर पोस्ट झाली व्हायरल 

इंस्टाग्रामवर ऐश्वर्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने टाकलेल्या फोटोंवरून सोशल मीडियावर अनेक निगेटिव्ह कमेंटचा सामना करावा लागतो. इंस्टाग्रामवर सतत रिल्स आणि फोटो पोस्ट करत नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असते. तिचे आणि नवऱ्याचे दोघांचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर टाकत असते.

नवीन फोटोंमुळे झाली ट्रोल 

ऐश्वर्या नारकर ही तिच्या नवीन फोटोंमुळे ट्रोल झाली आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्सवरून तिला ट्रोल करण्यात आलं आहे. या फोटोंमध्ये तिने आधुनिक पद्धतीचा ड्रेस घातला असून त्यामुळं तीला निगेटिव्ह कमेंटचा सामना करावा लागला. ऐश्वर्या यांनी बॅकलेस टॉप आणि पँट अशा लूकमध्ये हा फोटोशूट केला आहे. त्यावरूनच काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

फोटोवर केली कमेंट 

ऐश्वर्या नारकरच्या फोटोवर प्रेक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. त्यामध्ये 'ताई तुम्हाला शोभत नाही, आपली संस्कृती नका विसरू', असं एकाने म्हटलंय. तर 'आपण एक नावाजलेल्या अभिनेत्री आहात, हे तुम्हाला शोभत नाही. या वयात तर नाहीच नाही', असं दुसऱ्याने लिहिलंय.

काही लोकांनी ऐश्वर्या नारकरचे वजन कमी झाल्यामुळं तीच कौतुक केलं आहे तर काही लोकांनी असे फोटो टाकायला नको होते असं म्हटलं आहे. 'पन्नासाव्या वर्षी वाढलेलं पोट आणि टक्कल घेऊन फिरणारे लोक किंवा त्या आधीच्या वयाचे पण.. आपल्याला जी गोष्ट जमत नाही, ती एखाद्याने मिळवली तर नावं ठेवत बसतात', अशा शब्दांमध्ये काही लोकांनी बाजू घेतली आहे.