सार
अभिरामाच्या दोघंही सुना लीलासाठी चांगल्या सद्य घेऊन येतात. आणि तिला बळजबरीने नेसवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अभिरामची मोठी सून लीलाला दिलेली अंगठी चोरून पर्स मध्ये टाकते वाचा आजच्या भागात काय….
लीलाने अंगठी हरवल्याचे सांगताच अभिरामची तळपायाची आग मस्तकात जाते. तो लीला अंगठी शोधायला लावतो पण तीला अंगठी सापडत नाही. यावरून लीला फोने वर अभिरामला म्हणते तुम्हाला एवढंच असेल तर इथे येऊन अंगठी शोध. त्याप्रमाणे अभिराम येतो आणि अंगठी शोधायला सुरुवात करतो. शेवटच्या व्हिडीओ कॉलवर अभिरामला अंगठी दाखवताना लीला बेडरूममध्ये बसली होती. त्यामुळे आधी ते बेडरूम मध्ये शोधायला लागता. पण तिथेही अंगठी सांपडत नाही म्हणून अभिराम लीलाला विचारतो की, इथून तू कुठे गेली होती. त्यावर लीला उत्तर देते की,किचनमध्ये असं म्हणताच अभिराम लीलाच हाथ धरतो आणि तिला किचनमध्ये घेऊन जातो मात्र तिथेही त्याला अंगठी सापडत नाही.
हा संपूर्ण प्रकार होत असताना घराची अवस्था अत्यंत वाईट झालेली असते. सगळीकडे पसारा आणि भांडी पडली असतात. किचनमधून ते दोघे परत बेडरूमकडे जातात. बेडरूममध्ये गेल्या नंतर मात्र अभिरामची अवस्था पाहून लीला खार सांगून देते.अंगठी मिळताच अभिरामचा जीव भांड्यात पडतो आणि त्या अंगठी मागची भूमिका सांगतो. यावरून लीलाला वाईट वाटत.
अभिरामच्या सुना चोरतात लीलाला दिलेली अंगठी :
दुसऱ्या दिवशी सकाळी अभीरामच्या दोघंही सुना लिलासाठी महागातल्या साड्या घेऊन येतात. मात्र साड्यांच्या मागून त्यांचा वेगळाच डाव असतो. त्या दोघी अभिरामाने दिलेली अंतराची अंगठी चोरतात. आणि यामुळे लिलावर मोठं संकट आलं आहे.
खोट्या अंगठीमुळे लीला आणि एजेचा साखरपुडा मोडणार का?
लीलाला समजत की अभिरामने दिलेली अंगठी यात नाही. ती शोधाशोध घेते पण तिला सापडत नाही. ऐन रिंग सेरेमनीच्या वेळी अभिराम अंगठी बद्दल विचारतो. तेव्हा लीलाची आई म्हणते अंगठी माझ्या कडे आहे. पण ती अंगठी खोटी आहे असं त्याला लगेच लक्षात येत. यावर अभिराम चिडतो आणि लीलाला ओरडून विचारतो अंगठी कुठे आहे. पण हे पाहून लिला थेथून निघून जाते. यावरून लिला आणि अभिराम यांचा साखरपुडा होणार का नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला आहे.