अभिनेता अमीर खानच्या घरी २५ आयपीएस अधिकाऱ्यांची टीम पोहोचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही, त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
अभिनेता अमीर खान बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्याची गर्लफ्रेंड, नवीन चित्रपट आणि इतरही अनेक मुद्यांवरून तो कायमच माध्यमांमध्ये झळकत असतो. त्याचा सितारे जमीन पर हा चित्रपट आला असून तो चांगला चालला आहे. बॉक्स ऑफिसवर त्याचा हा चित्रपट चालला असून आता तो परत एकदा चर्चेत आला आहे.
इंटरनेटवर व्हिडीओ झाला व्हायरल
इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक दावा केला जात असून २५ आयपीएस अधिकाऱ्यांची टीम अमीर खानच्या घरी पोहचली आहे. व्हिडिओमध्ये पोलिसांच्या गाड्या आणि एक मोठी बस अमीर अमीरच्या घराबाहेर दिसून आली. ही बस पाहून एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी त्याच्या घरी का गेले हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
भेटीचं कारण अद्याप समोर आलं नाही
भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आयपीएस अधिकाऱ्यांनी भरलेली बस अमीर खानच्या घरी का गेली आणि त्यांनी तिथं जाऊन काय केलं हा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी तर ही बस गेली नव्हती ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. अमीर खान कायमच माध्यमांमध्ये चर्चेत येत असतो.
पोलिस यंत्रणेवर लवकरच चित्रपट येणार
अमिर खानने याआधीही सामाजिक विषयांवर आधारित सिनेमे किंवा कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे, त्यामुळे त्याचा हा आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद आगामी प्रोजेक्टसाठी माहितीचा भाग असू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. मात्र या भेटीविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
