सार

Pandharpur Karad Road Accident : अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आले आहे.

 

Pandharpur Karad Road Accident : पंढरपूरमध्ये भीषण अपघात झाल्याच समोर आलेय. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना धडक दिली. पंढरपूर -कराड रोडवरील कटफळ येथे हा भीषण अपघात झालाय. यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झालाय. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूरला शिफ्ट कऱण्यात आलेय. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलेय.अपघातील मृत आणि जखमी महिला सांगोल्यातील कटफळ येथील रहिवासी आहेत. या महिला मोलमजुरीचे काम करण्यासाठी चिकमहूद येथील शेतकऱ्यांच्या शेतावर गेल्या होत्या. काम संपल्यानंतर दुपारी घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर-कराड रोडवर एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याचवेळी पंढरपूरकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडवले. आज दुपारी चार वाजता हा भीषण अपघात झाला. आयशर ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट या सातही महिलांना चिरडले. या सर्व महिला या कटफळ येथील रहिवासी आहेत.